Dhanurmaas 2020 : धनुर्मास (खरमास) मध्ये पाळा हे 8 नियम, दूर होतील सर्व समस्या

पोलीसनामा ऑनलाइन – हिंदू धर्मात खरमास म्हणजेच धनुर्मासाच्या महिन्याला खुप महत्वपूर्ण मानले जाते. सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. डिसेंबर मध्यावर सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करतात. या महिन्याला धनुर्मास म्हणतात. धनुर्मासाची सुरूवात 15 डिसेंबरपासून झाली आहे. या महिन्यात कोणतेही शुभकार्य केले जात नाही.

धनुर्मास 14 जानेवारी 2021 ला मकर संक्रांतीला समाप्त होईल. 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल. याच दिवशी धनुर्मासाची समाप्ती होईल. धनुर्मासात कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केली जात नाहीत, परंतु काही विशेष उपायांनी या महिन्याचा लाभ घेता येऊ शकतो. मात्र, यासाठी काही नियम पाळावे लागतील.

सूर्याला जल अपर्ण करा –
धनुर्मासात दररोज सूर्याला जल अर्पण करा. यामुळे तुमचे आरोग्य चांगले होईल. सुख-समृद्धी प्राप्त होईल. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून उगवत्या सूर्याला अर्ध्य द्यावे.

तुळस पूजन –
हिंदू धर्मात तुळशीला खुप महत्व आहे. धनुर्मासात तुळशी पजून खुप शुभ मानले जाते. या महिन्यात प्रत्येक दिवशी सायंकाळी तुळशीत तूपाचा दिवा लावा. यामुळे जीवनातील समस्या कमी होऊ लागतील.

गरजवंतांना दान –
धनुर्मास दान आणि पुण्याचा महिना आहे. या महिन्यात केलेले दानाचे अनेकपटीने फळ मिळते. या महिन्यात जास्तीत जास्त गरजूंना दान करा. साधु-सन्याशांची सेवा करा.

एकादशीचे व्रत –
धनुर्मासात भगवान विष्णुंची पूजा करणे खुप कल्याणकारी मानले जाते. भगवान विष्णुंच्या विशेष कृपेसाठी धनुर्मासातील एकादशीचा उपवास जरूर करा. यामुळे वैकुठ धाम मिळते.

गोशाळेत जा –
धनुर्मासात गाईचे पूजन करणे खुप पुण्याचे मानले जाते. या महिन्यात गोशाळेत जा आणि गाईला गुळ, चणे खाऊ घाला. यामुळे भगवान श्रीकृष्णाची कृपा होईल.

तीर्थयात्रा –
धनुर्मासात तीर्थयात्रा करणे उत्तम मानले जाते. याशिवाय या महिन्यात भगवत गीता, श्री राम पूजा, कथा वाचन, विष्णु आणि शिवपूजन करणे सुद्धा शुभ असते.

पिंपळाची पूजा –
धनुर्मासात प्रत्येक दिवशी पिंपळाची पूजा करा. पिंपळाच्या झाडात देवांचा वास असतो. सकाळी पिंपळाच्या वृक्षाला जल अपर्ण करून त्याची पूजा करा. सायंकाळी दिवा लावा.

लक्ष्मी स्तोत्राचे पठन –
या महिन्यात प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी स्त्रोताचे पठन केल्याने लक्ष्मी मातेची कृपा होते. धनुर्मासात याचे पठन करणार्‍यांच्या घरात सुख-समृद्धी आणि लक्ष्मी वास करते.