पत्रकार खशोग्गींची हत्या ही आमची चूक : सौदी अरेबिया

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – पत्रकार जमाल खशोग्गींची हत्या करणे ही आमची चूक होती, अशी स्पष्ट कबुली सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री अदल-अल-जुबैर यांनी दिली आहे. खशोग्गींची हत्या करणाऱ्या व्यक्तीने आपल्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन हे कृत्य केले आहे. ही आमच्याकडून झालेली मोठी चूक आहे. हे कुठल्याही सरकारमधील अस्वीकाहार्य बाब आहे, असे जुबैर यांनी म्हटले आहे. खशोग्गींच्या हत्येमागील सत्य सौदी अरेबिया शोधून काढेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. खशोग्गींना ठार केल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री अदल-अल-जुबैर म्हणाले, आम्ही या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही यातील सर्व तथ्य शोधून काढू. तसेच खशोग्गींच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल. खशोग्गींच्या हत्या प्रकरणाविषयी सौदीचे राजे मोहंम्मद बिन सलमान आणि इंटेलिजन्सला कुठलीच पूर्वकल्पना नव्हती. खशोग्गींच्या हत्येसंबंधी १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

स्वस्त घरांचे स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या बिल्डरला अटक

तुर्कीच्या इस्तंबुल येथील सौदी दुतावासामध्ये प्रवेश करताना खशोग्गी यांना २ ऑक्टोबर रोजी बघितले गेले होते. काही दिवसांपूर्वीच सौदीने खशोग्गी यांची हत्या दुतावासामध्येच करण्यात आली असल्याचे कबूल केले आहे. खश्शोगी हे पत्रकार असून ते सातत्याने सौदी राजघराण्याविरुद्ध लिखाण करत असत. अल-अरब वृत्तवाहिनीचे माजी मुख्य संपादक म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांनी अल-वतन या सौदी वृत्तपत्रासाठीही संपादक म्हणून काम केले होते. वॉशिंग्टन पोस्ट या नामांकित दैनिकासाठी खशोग्गी यांनी स्तंभलेखन केले आहे.