‘बिग बॉस’मध्ये जाऊ इच्छित होती ‘ही’ खतरों के खिलाडीची स्पर्धेक, मात्र पतीला आवडत नाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बिग बॉस 13 हा रिअ‍ॅलिटी शो संपला आहे आणि खतरों के खिलाडी हा शो सुरू झाला आहे. अनेक बड्या कलाकारांना या शोमध्ये भाग घेतला आहे. या शोमध्ये अ‍ॅक्ट्रेस आणि डान्सर अमृता खानविलकर देखील दिसत आहे. पहिल्या आठवड्यात अमृतानं अनेक चांगले स्टंट केले आणि स्वत:ला सुरक्षित केलं आहे. अलीकडेच तिनं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिनं शोची जर्नी, स्टंट आणि स्पर्धकांवर भाष्य केलं.

अमृता खानविलकर म्हणाली, “मला वाटतं की, जर एखाद्या अ‍ॅक्टरला खतरों के खिलाडी ऑफर होत असेल तर त्यानं तो करायला हवा. कारण हा एक लाईफटाईम एक्सपेरियंस आहे. पैसे खर्च करूनही तुम्हाला असा अनुभव मिळणार नाही. या शोमधील प्रत्येक स्टंट एका शॉकप्रमाणे असतो. एक स्पर्धक म्हणून मी आमच्या भीतीबद्दल बोलत आहे.”

अमृताच्या पतीला नाही आवडत बिग बॉस
बिग बॉसबद्दल बोलताना अमृता म्हणाली, “माझा पती तो शो करण्यासाठी मला कधीच परवानगी देत नाही. हिमांशु खूपच वेगळा माणूस आहे. तो खूप क्लिअर आहे. त्याला घरातही भांडणं करायला आवडत नाही. मग टीव्हीवर तेही बिग बॉसमध्ये NO No. यावेळाच बिग बॉसचा प्रवास मस्त होता. जेव्हा तो घरी नसतो तेव्हा शो पहात होते. जेव्हा तो यायचा तेव्हा मी चॅनल बदलायचे.”

View this post on Instagram

💃🏻 #fullfigure @zaraindiaofficial @iamsonalikhare

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

You might also like