‘नागिन’ फेम अभिनेत्री अदा खानला चावले विंचू, हातातून आलं रक्त (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खतरों के खिलाडी 10 या रोहित शेट्टीच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये हैराण करणारे आणि खतरनाक स्टंट्स स्पर्धकांना दिले जाताना दिसत आहेत. नागिन सीरिजचा हिस्सा असलेली अभिनेत्री अदा खान ही देखील खतरों के खिलाडीमध्ये आहे. अद्याप अदानं अनेक खतरनाक स्टंट्स करू स्वत:ला सिद्ध केलं आहे. रविवारी झालेल्या एपिसोडमध्ये अदानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की, तीही कोणापेक्षा कमी नाहीये.

खतरों के खिलाडी मध्ये मागच्या एपिसोडमध्ये टीम टास्क झाले. दोन टीम बनवण्यात आल्या होत्या. अदा खान अ‍ॅक्टर करण पटेल याच्या टीममध्ये होती. यातील एका टास्कदरम्यान अदा खानला विंचू चावला. यानंतर तिच्या हातातून रक्तही आलं होतं. अदाला पूर्ण बॉडीवर विंचूंनी चावा घेतला. परंतु अदानं हार मानली नाही. तिनं मोठ्या धाडसानं टास्क पूर्ण केलं आणि आपल्या टीमला जिंकवलं. टास्क पूर्ण झाल्यानंतर तेथे उपस्थित मेडिकल टीमनं अदाचं चेकअपही केलं.

काय होतं टास्क ?

टास्क दरम्यान अदा आणि कोरियोग्राफर धर्मेशच्या अपोजिट मलिष्का आणि शिविन नारंग होते. यात अदा आणि धर्मेशची टीम जिंकली. त्यांनी एक स्पर्धक बॉक्समध्ये झोपला होता. त्यात 300 विंचू सोडण्यात आले होते. दुसऱ्याला मास्क लावून मास्कमध्ये विंचू गोळा करत बॉक्समध्ये टाकायचे होते. 3 मिनिटांची वेळही यासाठी देण्यात आली होती. ज्यांनी जास्त विंचू काढले ती टीम जिंकली. अदा आणि धर्मेशच्या टीमनं 70 विंचू काढले.