Khatron Ke Khiladi 10 : खतरनाक प्रवासाला आजपासून सुरुवात, ‘भीती’च्या परीक्षेचा रोहित घेणार ‘क्लास’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खतरों के खिलाडी सीजन 10 शनिवार दि 22 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. शोचे होस्ट डायरेक्टर रोहित शेट्टीसोबत टीव्हीचे धाडसी सेलेब्स आजच या रोमांचक प्रवासाला सुरुवात करणार आहेत. या शोमध्ये भीती आणि धोक्याची लेवल काय असणार आहे तसेच यावेळी कोणकोणते स्पर्धक यात दिसणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

खतरों के खिलाडी सीजन 10 चा पहिला एपिसोड 22 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता प्रसारीत केला जाणार आहे. हा शो कलर्स चॅनलवर ऑन एअर होणार आहे. रोहित शेट्टी शो होस्ट करणार आहे. रोहितनं याआधीही पाच सीजन्स होस्ट केले आहेत.

‘इथं’ झाली शुटींग

सध्या खतरों के खिलाडी 10 चा एक प्रोमो व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. या शोची शुटींग बुल्गारियामध्ये करण्यात आली आहे. बुल्गारियाच्या सुंदर लोकेशन्सवर करण्यात आलेले अ‍ॅडवेंटर गेम्स आणि स्टंट्स चाहत्याना इम्प्रेस करतील यात शंका नाही.

शोमध्ये असणार हे 10 टीव्ही सेलेब्स

यावेळी शोमध्ये पॉप्युलर चेहरे दिसणार आहेत. करिश्मा तन्ना, रानी चटर्जी, करण पटेल, आरजे मलिष्का, अदा खान, शिविंग नारंग, धर्मेश येलांदे, बलराज स्याल, तेजस्वी प्रकाश, अमृता खानविलकर असे एकूण 10 स्पर्धक शोचा हिस्सा असणार आहे.

दहापट अवघड टास्क

नेहमीप्रमाणे या भागातही खतरनाक स्टंट असणार आहेत यात शंका नाही. यावेळी टास्क दहापट टफ असणार आहेत. वेगवान ट्रेनवरून बाईक क्रॉस करणं, सिंह, अजगर आणि किडे मकोडे, पाण्यात स्टंट, उंचावरून उडी मारणं असे अनेक खतरनाक स्टंट असणार आहेत.

या स्पर्धकांचा असणार गेस्ट अपीरंस

यावेळी या शोमध्ये 7 स्पेशल गेस्ट असणार आहेत. अभिषेक वर्मा, स्मृती कालरा, सलमान युसूफ खान, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, बीर मायरा हे सगळे गेस्ट म्हणून शोमध्ये येणार आहेत.