खतरों के खिलाडी : अजगरानं स्टंट करताना ‘या’ अभिनेत्रीला घातला ‘विळखा’, अभिनेत्रीला फुटला ‘घाम’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डायरेक्टर रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी 10 या शो मध्ये अनेक एक से बढकर एक स्टंट पहायला मिळत आहेत. यावेळी या शोमध्ये करण पटेल, धर्मेश, बलराज सिंह, करिश्मा तन्ना, तसेच इतरही कलाकार दिसत आहेत. यापैकीच एक आहे सीरियल पहरेदार पिया की मधीसल तेजस्वी प्रकाश.

…आणि तेजस्वीला फुटला घाम

शोच्या या आठवड्यात तेजस्वी प्रकाश शोमध्ये खूप मस्ती करताना दिसणार आहे. सोबतच ती एका मोठा खतरा असणाऱ्या टास्कला सामोरी जाणार आहे. रोहित शेट्टी तिला एक अजगर देणार आहे ज्यामुळे तिला घाम फुटताना दिसणार आहे.

या एपिसोडचा एक नवीन प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, तेजस्वीच्या गळ्यात एक अजगर आहे ज्याला ती प्रचंड घाबरत आहे. फक्त तो अजगर तिच्या गळत पडून नाहीये तर तो तिला पकडताना दिसत आहे. तेजस्वी प्रचंड घाबरली आहे हे पाहून रोहित शेट्टीसह इतरही स्पर्धक हसताना दिसत आहेत.

याशिवाय तेजस्वीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तिला बॉलिवूडच्या सिनेमाचं नाव ओळखायचं आहे. परंतु तिनं चुकीचं नाव सांगितल्यानंही सारे तिला हसतात. रोहित शेट्टीनं तिचं नाव सर्वात बडबड करणारी मुलगी असं नाव दिलं आहे.