Khatron Ke Khiladi 13 | ‘खतरों के खिलाडी 13’साठी या स्पर्धकांची नावे झाली फायनल

पोलीसनामा ऑनलाइन : Khatron Ke Khiladi 13 | ‘बिग बॉस 16’ या शोने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांची रजा घेतली आहे. आता प्रेक्षकांना सिने निर्माता रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी या लोकप्रिय कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे. लवकरच ‘खतरो के खिलाडी 13’ (Khatron Ke Khiladi 13) हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावरील साहसी खेळ म्हणून खतरो के खिलाडी या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. आता या पर्वात कोणते स्पर्धक असतील याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

पुढील स्पर्धक खतरो के खिलाडी 13 मध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिव ठाकरे
शिव ठाकरेने यंदाच्या बिग बॉस 16 मध्ये त्याच्या खेळीने सर्वांचेच मन जिंकले आहे. तर रोहित शेट्टी जेव्हा घरात खतरो के खिलाडी 13 साठी (Khatron Ke Khiladi 13) स्पर्धकांची निवड करायला आला त्यावेळी शिव हा टास्क हरला मात्र त्याने रोहितचे मन जिंकले होते. खतरो के खिलाडी 13 साठी शिवला विचारण्यात आल्याचे समोर आले आहे.

अर्चना गौतम
आता शिवप्रमाणे अर्चनाचे नाव देखील यामध्ये समाविष्ट झाले आहे. अर्चनाने देखील आपल्या खेळीने रोहित शेट्टीला वेड लावले होते. अर्चनाचे नाव देखील खतरो के खिलाडीच्या 13 व्या पर्वात जोडले जात आहे. मात्र अद्याप तरी या संदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही.

सौंदर्य शर्मा
खतरों के खिलाडी 13 मध्ये सौंदर्य शर्माची देखील वर्णी लागणार असल्याचे समोर आले आहे.

उर्फी जावेद
उर्फी आजवर ‘बिग बॉस ओटीटी’, ‘स्प्लिट्सविला’ या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली होती. उर्फी तिच्या हटके फॅशन स्टाईल मुळे देखील ओळखली जाते. आता खतरों के खिलाडी 13 व्या पर्वात उर्फीचा देखील समावेश असणार आहे.

नकुल मेहता आणि दिशा परमार
खतरो के खिलाडी 13 च्या पर्वात ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतील मुख्य कलाकार नकुल मेहता आणि
दिशा परमार देखील दिसणार आहेत.

मुनव्वर फारुकी
लॉकअप च्या पहिल्या पर्वाचा विजेता मुनव्वर फारुकी याची वर्णी देखील खतरो के खिलाडी 13 मध्ये लागणार आहे.

सुम्बुल तौकीर खान, प्रियंका चहर चौधरी आणि अंकित गुप्ता
बिग बॉस 16 मध्ये सुम्बुल तौकीर खान, प्रियंका चहर चौधरी आणि अंकित गुप्ताने आपल्या खेळीने सर्वांचेच
लक्ष वेधून घेतले होते. तर आता या तिन्ही स्पर्धकांचा समावेश देखील खतरो के खिलाडीच्या 13 व्या पर्वात
होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खतरो के खिलाडीच्या यंदाच्या पर्वात एकापेक्षा एक स्पर्धक पाहायला मिळणार आहेत.
यांची खेळी पाहण्यासाठी सध्या प्रेक्षक आतुर झाले आहेत. लवकरच या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

Web Title :- Khatron Ke Khiladi 13 | rohit shetty khatron ke khiladi 13 contestants list shiv thakare urfi javed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Budget Session 2023 | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी, देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं, म्हणाले- ‘आम्ही हे खपवून घेणार नाही, हे…’

Pune Crime News | झोन-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून शहरातील 2 सराईत गुन्हेगार तडीपार

MNS Chief Raj Thackeray | ‘राज ठाकरेंनी वाचन वाढवावं’ म्हणाऱ्यांना राज ठाकरेंचा टोला, म्हणाले – ‘मी जेव्हा चार दुऱ्या टाकतो, तेव्हे ते…’