करिश्मानं तोडल्या भीतीच्या साऱ्या ‘मर्यादा’, तोंडानं पकडले साप, पाहताना येईल अंगावर काटा ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – रोहित शेट्टीचा शो खतरों के खिलाडी 10 ला सुरुवात झाली आहे. शोच्या पहिल्याच वीकमध्ये रानी चटर्जी, आरजे मलिष्का, बलराज स्याल नॉमिनेटेड आहेत. शोच्या पहिल्याच आठवड्यात अंगावर काटा आणणारा स्टंट पहायला मिळत आहे. आता एक नवीन प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यात दिसत आहे की, अ‍ॅक्ट्रेस करिश्मा तन्ना तोंडानं साप पकडत आहे.

Advt.

कलर्स टीव्हीच्या इंस्टाग्रामवरून हा प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कलर्सनं म्हटलं आहे की, “थोडी भीती, थोडी मजा, सर्व होणार या वीकेंडला खतरों के खिलाडी 10 मध्ये.” सध्या व्हिडीओची सोशलवर चर्चा सुरू आहे.

करिश्मा तन्नानं तोंडानं पकडला साप

व्हिडीओत दिसत आहे की, कॉमेडीयन भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचिया पाण्यानं भरलेल्या एका बॉक्समध्ये आहे. करिश्मा दुसऱ्या पाण्यानं भरलेल्या बॉक्समधून तिच्या तोंडानं साप पकडत आहे आणि हर्ष उभा असलेल्या दुसऱ्या बॉक्समध्ये टाकत आहे. सर्व लोक करिश्माला चिअर करतानाही दिसत आहेत. करिश्माचा हा स्टंट पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. सध्या करिश्मचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.