पुणे गुन्हे शाखेकडून भेसळयुक्त खवा जप्त

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत गुजरातमधून पाठविलेला साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा गुन्हे शाखेने पकडला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आराम बसच्या चालकासह एका विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेने पद्मावतीनजीक केली.

[amazon_link asins=’B01HOKY7OS,B06XCQ7CNX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7816d7bc-b51a-11e8-8de7-dfd31979f535′]

सहकारनगर, धनकवडी भागात गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन जाधव गस्त घालत होते. त्या वेळी पद्मावतीनजीक खासगी आराम बसमधून गणेशोत्सवात भेसळ केलेला बनावट खवा विक्रीसाठी पुण्यात पाठविण्यात आला असल्याची माहिती जाधव यांना मिळाली. खातरजमा केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना या बाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम यांनी दिली. पद्मावती भागातील खासगी आराम बसच्या थांब्यानजीक पोलिसांनी सापळा लावला. अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी प्रशांत गुंजाळ, कुलकर्णी, स्वाती म्हस्के तेथे आले. गो-गंगा, भाग्यलक्ष्मी, वीरकृपा या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून आलेला ३५०० किलो खवा जप्त करण्यात आला. या प्रवासी करणाऱ्या कंपनीचा बसचालक तसेच बनावट खवा घेऊन आलेला भावेश पटेल यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
[amazon_link asins=’B075FY4RWK,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dff2a4dc-b51d-11e8-b829-7be47104341a’]

पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, सचिन जाधव, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, तुषार माळवदकर, रिजवान जिनेडी, तुषार खडके, गजानन सोनुने यांनी ही कारवाई केली.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

पोलीसनामा न्युज

पुण्यातील ब्रेकिंग तसेच राज्यासह देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा…
https://t.me/policenamanews