पैश्याच्या वादातून चुलत भावाने लोखंडी हत्याराने मारहाण

खेड : पोलीसनामा ऑनलाइन
खेड परिसरातील वाबगाव येथेआर्थिक वादातून चुलत भावने लोखंडी हत्याराने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विजय दत्तात्रेय कांबळे यांनी खेड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याप्रमाणे मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,”फिर्यादी विजय दत्तात्रेय कांबळे (वय:३२ रा.वाबगाव,) यांनी चुलत्याकडून काही महिन्यांपूर्वी एक लाख रुपये घेतले होते. यामधूनच अगोदर किरकोळ भांडण झाले,मात्र त्यानंतर रात्री उशिरा वाद होऊन भांडण झाले यात लोखंडी हत्याराने फिर्यादी यांना प्रशांत जालिंदर कांबळे, संदीप कांबळे, दिनेश आगवणे, इब्राहम शेख यांच्या टोळक्याने मारहाण केली, तसेच त्यांचा भावाला देखील लाथा बुक्यांनी मारले.

या वादात फिर्यादी आणि त्यांचा भाऊ किरकोळ जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार फिर्यादीच्या घरासमोरील अंगणात झाला,आरोपी आणि फिर्यादी हे शेजारी शेजारी राहतात. याप्रकरणी खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेल नाही.पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.