खेड पं.स.चे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाला हायकोर्टाकडून स्थगिती

राजगुरुनगर, ता. १० : पोलीसनामा ऑनलाइन : उच्च न्यायालयाने खेड पंचायत समितीचे (khed panchayat samiti) सभापती भगवान पोखरकरांवरील अविश्वास ठरावाला स्थगिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (दि १०) स्थगिती दिली आहे. याचिकाकर्ते समितीचे माजी उपसभापती, विद्यमान सदस्य अमोल पवार यांनी ही माहिती दिली. पोखरकर यांच्या समर्थक दोन सदस्यांना ठरावावर मतदान होताना सभागृहात जबरदस्तीने हात वर करायला सांगण्यात आले या मुद्यावर न्यायालयाने ही स्थगिती दिली आहे. याबाबतचे सभागृहातील व्हिडीओ चित्रकरण न्यायालयात सादर करण्यात आले आहे. सभापती भगवान पोखरकर, माजी उपसभापती अमोल पवार आणि ज्योती आरगडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे खेड पंचायत समितीचे (khed panchayat samiti) सभापती पोखरकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ११ विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाल्याचे ३१ मे रोजी खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी घोषित केले होते.

आपसांत ठरल्यानुसार राजीनामा दिला नाही.

म्हणून खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या ६ सदस्यांनी बंड करून त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला.

त्यावर ३१ मेला चर्चा होऊन मतदान घेण्यात आले. त्यात सेनेचे ६, भाजपचे उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आशा ११ जणांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले होते.

भगवान पोखरकर यांच्या बाजूने ३ मते पडली होती.

एकमेकांवर टोकाचे आरोप

तत्पुर्वी ठराव मांडला म्हणून सभापती पोखरकर यांनी विरोधातील सदस्य एकत्रित पणे सहलीला गेल्यावर ते मुक्कामी
असलेल्या हॉटेलमध्ये अपरात्री जाऊन गोळीबार, विनयभंग केल्याचा आरोप झाला होता.

त्यावरून पोखरकर व अन्य २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरावरून तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील, सेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकमेकांवर टोकाचे आरोप केले होते.

भगवान पोखरकर हेच सभापती राहणार

या पार्श्वभूमीवर सेनेचे नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच राजगुरूनगर येथे येऊन पत्रकार परिषद घेतील.
त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याना व आमदार मोहिते पाटील यांना टार्गेट केले होते.

महाआघाडीत बिघाडी निर्माण करणारे राजकीय वातावरण तयार झाले होते.

स्थगिती आल्यानंतर अटकेत असले तरी भगवान पोखरकर हेच सभापती राहणार आहेत.
पुढील सुनावणी २६ जुनला असून त्यावेळी होणाऱ्या निर्णयावर पुढील समीकरणे रंगतील.

शिवसेनेच्या सदस्यांवर राष्ट्रवादीचे आमदार मोहिते पाटील यांनी दबाव आणून हे घडविले असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता.

२६ जून पर्यंत पंचायत समिती सभापती विरोधात अविश्वास ठराव मंजुरीला स्थगिती देण्यात आली आहे.

ॲड. रोहन होगले यांनी माजी सभापती भगवान पोखरकर, अमोल पवार, ज्योती आरगडे यांच्यावतीने याचिका दाखल केली होती. दरम्यान तालुक्यात हे प्रकरण चांगलेच गाजले आहे.

आता स्थगितीमुळे या आरोपात तथ्य आहे का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर खोचक टीका, म्हणाले – ‘आमची मैत्री जंगलातल्या वाघासोबत, पिंजऱ्यातल्या नाही’

 

Neem Juice : जेवढं कडू तेवढंच फायदेशीर, आजारांना जवळ देखील येऊ नाही देत; जाणून घ्या