Khed-Rajguru Nagar Pune | पुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 550 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, 27 जण रुग्णालयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Khed-Rajguru Nagar Pune | पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. JEE आणि IIT परिक्षेची पुर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्याच्या कडूस येथील दक्षणा फाउंडेशन (Dakshana Foundation in Kadus) मध्ये हा खळबळजनक प्रकार घडला असून 27 विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कडुस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये देशातील विविध राज्यातून JEE आणि IIT अशा वेगवेगळ्या पूर्वपरीक्षांच्या तयारी अभ्यासक्रमासाठी निवासी आहेत. शुक्रवारी (दि.19) रात्री बटाटा भाजी, चपाती, डाळ-भात असा जेवण तयार करण्यात आले होते. हे जेवण केल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.(Khed-Rajguru Nagar Pune)

शुक्रवारी रात्री 550 विद्यार्थ्यांनी जेवण केले. ज्यामध्ये 27 विद्यार्थ्यांना जुलाब, उलटीचा त्रास जाणवू लागला. विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा प्रकार समजताच राजगुरुनगर पोलिसांसह डॉक्टरांची टीम चांडोली ग्रामीण रुग्णालयात (Chandoli Rural Hospital)
पोहोचली. काही मुलांना ऑक्सिजन लावण्यात आले असून तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
विषबाधा झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरातच सुरू होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून परदेशी महिलेची सुटका

Sanjay Kakade | संजय काकडेंची नाराजी दूर करण्याचे भाजपाचे प्रयत्न, आशिष शेलारांनी घेतली भेट

Pune Rape Case | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; चिराग मुकेश निहलानी वर गुन्हा दाखल