Khed Shivapur Toll Plaza | ‘खेड शिवापूर टोलनाका भोर हद्दीच्या पुढे स्थलांतरित करा’; खासदार सुप्रिया सुळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) खेड शिवापूरचा टोल नाका (Khed Shivapur Toll Plaza) भोर हद्दीच्या पुढे स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे. या बाबत त्यांनी रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पत्र देखील पाठवले आहे. खेड शिवापूर टोल नाका (Khed Shivapur Toll Plaza) स्थलांतरित करण्यात यावा या मागणीसाठी स्थानिकांनी आंदोलन (Agitation) सुरु केले आहे. त्यामुळे स्थानिकांच्या मागणीचा विचार करण्याची विनंती सुळे यांनी केली आहे.

 

सुप्रिया सुळे यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की,
बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) हवेली तालुक्यातील शिवापूर टोलनाका (Khed Shivapur Toll Plaza) हा पुणे शहराच्या विस्तारित हद्दीमध्ये म्हणजेच पीएमआरडीएच्या (PMRDA) हद्दीत येतो.
सातारा महामार्गावर रस्त्याच्या अत्यंत जवळ असल्यामुळे भोर फाट्यापर्यंत केवळ 25 किलोमीटरसाठी स्थानिकांना आणि पुणे येथील नागरिकांना 80 किलोमीटरचा टोल भरावा लागत आहे.
या महामार्गावर 50 ते 60 किलोमीटरच्या परिसरात अनेक पर्यटन स्थळे,
देवस्थाने, ऐतिहासिक स्थळे असून पुणेकर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणांना भेटी देत असतात.
तरी स्थानिक ग्रामस्थ आणि पुणेकरांना टोल भरावा लागू नये अशी त्यांच्याकडून गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे.
त्यामुळे टोलनाका भोर फाट्याच्या पुढे स्थलांतरित करावा अशी मागणी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने (Shivapur Toll Naka Hatav Kruti Samiti) केली आहे.
त्यामुळे स्थानिकांच्या आणि पुणेकरांच्या मागणीचा विचार होऊन टोल नाका भोर हद्दीच्या पुढे स्थलांतरित (Migrants)
करण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी.
अशी विनंती सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरी यांना मार्चमध्ये देखील पत्र पाठवत पुणे – सातारा रस्त्यावरील खेड – शिवापूर टोलनाका प्रकरणात आपण वैयक्तिक लक्ष घालावे.
तसेच हा टोलनाका पीएमआरडीए हद्दीबाहेर स्थलांतराबाबत कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात,”
अशी विनंती केली होती.
आता पुन्हा एकदा त्यांनी पत्र पाठवत टोलनाका स्थलांतराची मागणी केली आहे.

 

 

Web Title :- Khed Shivapur Toll Plaza | Move Khed Shivapur Toll Plaza beyond Bhor border
MP Supriya Sules letter to Union Minister Nitin Gadkari

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा