Khel Ratna Award | गोल्डन बॉय नीरज चोप्राला ‘खेल रत्न’; शिखर धवनसह 35 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने (Khel Ratna Award) गौरव करण्यात आला आहे. निरज चोप्रासह (Niraj Chopra) 12 जणांना खेल रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. नीरज शिवाय टोकयो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या रवी दहिया (Ravi Dahiya), पीआर श्रीजेश (PR Sreejesh) आणि लवलीना बोरगोहोई, भारताची अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) आणि फूटबॉलपटू सुनील चेत्री यांनाही खेल रत्न पुरस्कार (Khel Ratna Award) दिला जाणार आहे.

या खेळाडूंना दिला जाणार खेल रत्न (Khel Ratna Award)

नीरज चोप्रा (एथलेटिक्स), रवी दहिया (कुस्ती), पीआर श्रीजेश (हॉकी), लवलीना बोर्गोहेन (बॉक्सिंग), सुनील छेत्री (फूटबॉल), मिताली राज (क्रिकेट), प्रमोद भगत ( पॅरा बॅडमिंटन), सुमित अंतिल (पॅरा भाला फेक), अवनी लेखरा (पॅरा शूटिंग), कृष्णा नगर ( पॅरा बॅडमिंटन), एम नरवाल (पॅरा शूटिंग), मनप्रीत सिंग (हॉकी)

Dengue | कोणताही ताप डेंग्यू आहे किंवा नाही? डॉक्टर्स ‘या’ टेस्टद्वारे करतात निदान, तुम्ही सुद्धा जाणून घ्या

या खेळाडूंना दिला जाणार अर्जुन पुरस्कार (Arjuna Award)

योगेश कथुनिया (डिस्कस थ्रो), निषाद कुमार (हाय जम्प), प्रवीण कुमार (हाय जम्प), शरद कुमार (हाय जम्प), सुहास एलवाई (पॅरा बॅडमिंटन), सिंहराज अंधाना (शूटिंग), भाविना पटेल (पॅरा टेबल टेनिस), हरविंदर सिंह (तीरंदाजी), शिखर धवन (क्रिकेट), अरपिंदर सिंग (ऍथलिटिक्स), सिमरनजीत कौर (बॉक्सिंग), भवानी देवी आनंदा (फेन्सिंग), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), संदीप नरवाल (कबड्डी), हिमानी परब (मल्लखांब), अभिषेक वर्मा (शूटिंग), अंकिता रैना (टेनिस), दीपक पुनिया(कुस्ती), दीलप्रीत सिंग (हॉकी), हरमनप्रीत सिंग (हॉकी), सुरेंद्र कुमार (हॉकी), अमित रोहिदास (हॉकी), बिरेंद्र लकरा (हॉकी), सुमित (हॉकी), निलकांता शर्मा (हॉकी), हार्दिक सिंग (हॉकी), विवेक सागर प्रसाद (हॉकी), गुरुजंत सिंग (हॉकी), मनदीप सिंग (हॉकी), शमशेर सिंग (हॉकी), ललित कुमार उपाध्याय (हॉकी), वरुण कुमार (हॉकी), सिमरनजीत सिंग (हॉकी)

13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामानाथ कोविंद (President Ramanath Kovind) यांच्याहस्ते खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
राष्ट्रपती भवनातल्या दरबार हॉलमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Ajit Pawar | होय, अजित पवारांबाबतचा ‘तो’ बार फुसका ! उपमुख्यमंत्र्यांना ना इन्कम टॅक्सची नोटीस, ना संपत्तीवर ‘टाच’; जाणून घ्या प्रकरण

Social Media App | 11 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये वाढला ‘या’ आजाराचा धोका, वेगाने पसरतोय हातपाय, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Khel Ratna Award | tokyo olympic gold medalist neeraj chopra to get khel ratna award know names of Arjuna Award

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update