खिळेमुक्त झाडे अभियानाला मिळाले प्रशासनाचे पाठबळ …

पुणे :पोलीसनामा आॅनलाईन

अंघोळीची गोळी संस्था आणि इतर सामाजिक संस्था गेली चार महिने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील झाडांवरील खिळे आणि तारा काढत आहोत.प्राधिकरण,संभाजीनगर,रस्टन कॉलोनी,थेरगाव रस्त्यांवरील झाडांचे जवळपास १०००० खिळे काढलेले आहेत.ह्यात ४० हुन अधिक सामाजिक संस्था सामील झाल्या आहेत.ट्री ऍक्ट नुसार झाडांना इजा करणे यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत.मागील महिन्यात अंघोळीची गोळीचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले पण त्यावर प्रशाशनाकडून ठोस कारवाई झाली नाही.

[amazon_link asins=’B0756Z242J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’00d67dce-8e68-11e8-87c5-01e0c4723fe7′]

पुन्हा एकदा सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना भेटून पत्राद्वारे अशी विनंती केली की, झाडांवरती खिळे ठोकून, तारा बांधून जे कोणी जाहिरात करतात, त्यांच्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलावीत.प्रशासनाने ह्याला उत्तम प्रतिसाद देत जाहीर नोटीस काढून झाडांवर जाहिरात करणाऱ्यांवर महाराष्ट्र विरूपण प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची समज दिली आहे.जाहिरातदारांना तीन दिवसामध्ये जाहिराती काढण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहे.ह्यावेळी अंघोळीची गोळीचे अध्यक्ष माधव पाटील म्हणाले कि खिळेमुक्त झाडे ह्या चळवळीचे हे यश आहे आणि ह्यात सर्व सामाजिक संघटना आणि प्रसिद्धी माध्यमांचा वाटा आहे.पिंपरी-चिंचवड मधील झाडांवरचा शेवटचा खिळे निघेपर्यंत हि चळवळ अशीच चालू राहील.पिंपरी चिंचवड महानगरपालिकने उचलेले पाऊल नक्कीच अभिनंदनास्पद आहे आणि आता महाराष्ट्राच्या सर्व नगरपालिकने ह्याचे अनुकरण करावे.
जाहिरात