खुशखबर ! UP मध्ये ‘DL’ परत गेल्यास 4 महिने वाट पाहण्याची नाही गरज, महाराष्ट्रात कधी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमचा वाहन परवाना जर पोस्टमनने एखाद्या कारणाने परत पाठवले तर घाबरुन जाण्याचे कारण नाही, कारण तुम्हाला आता 3 ते  4 महिने वाट पाहावी लागणार नाही. तुमचा वाहन परवाना परत पाठवण्यात आल्यास तो तुम्हाला लवकरच परत मिळेल. यासाठीचे केंद्र गाजियाबाद रिजनल कार्यालय, आरटीओ असेल.

 
नोएडा, बुलंदशहर आणि हापुडचे वाहन परवाने येथून प्राप्त करता येईल. रीजनलच्या चारीही जिल्ह्यात रस्त्यांच्या संख्येऐवढे वाहन परवाने लखनऊला परत पाठवण्यात येतात, जे वाहनधारकांना परत मागवताना अडचणी येतात. यासाठी विभागाने शासनाला प्रस्ताव पाठवला आहे.

वाहन परवाना मिळवणे ही प्रक्रिया आता ऑनलाइन आहे, परंतू वाहन परवाना मिळेपर्यंत बऱ्याच अडचणी येतात. आधी 5 दिवसात वाहन परवाना मिळत होता, परंतू आता जास्त वेळ लागतो.  

 
हा त्रास थांबवण्यासाठी शासनाने वाहनपरवाना लखनऊ मधून बनवून पाठवण्याचा व्यवस्था केली आहे. आता 15 दिवसात लोकांना हा परवाना मिळतो. परंतू काहीचे वाहन परवाने अजूनही लवकर मिळत नाहीत. याला कारण पोस्ट ऑफिस देखील आहे आणि लोक देखील. कारण जेव्हा पोस्टमन वाहन परवाना घेऊन घरी पोहचतो पण लोकांच्या घराला तेव्हा लॉक असते किंवा घराचा पत्ता चूकीचा असतो. 

त्यामुळे पोस्टमन वाहन परवाना लखनऊला परत पाठवून देतो. त्यामुळे लोकांना आणखी 3 ते 4 महिने वाट पहावी लागते. त्यामुळे लोकांना आरटीओ कार्यालयात चक्कर मारावी लागते. लोकांकडे थेट वाहन परवाना पोहचत नाही. 
 
अधिकाऱ्यांच्या रिपोर्टनुसार येतो वाहन परवाना –
वाहन परवाना परत लखनऊला परत आल्यावर अधिकाऱ्यांना त्याचा रिपोर्ट शासनाला पाठवावा लागतो, त्यानंतर वाहन परवाना परत पाठवण्यात येतो. अनेकदा रिमाइंड करुन देखील वाहन परवाना परत पाठवण्यात येत नाही. तेथे कितीतरी हजार वाहन परवाने तयार करण्यात येतात त्यानंतर त्यांना पँक करुन संबंधित जिल्ह्यात पाठवण्यात येतात. 
 
अशी असेल प्रक्रिया –
आतापर्यंत लखनऊशी संबंधित जिल्ह्यात वाहनपरवाने परत पाठवण्यात येत होते, परंतू आता संबंधित जिल्ह्यात न पाठवता नोएडा, बुलंदशहर आणि हापूडचे वाहन परवाने गाजियाबाद रिजनल केंद्रावर पाठण्यात येणार आहे. तेथून पुढे ते 10 ते 15 दिवसात वाहन परवाना तुम्हाला प्राप्त होईल. 
 
1000 पेक्षा अधिक वाहन परवाने केले परत –
जिल्ह्यातील पोस्टमनकडून 1 हजार पेक्षा जास्त वाहन परवाने परत पाठवले आहे. अधिकाऱ्यांने अनेकदा हे परवाने परत मागवण्यासाठी पत्र लिहिले परंतू वाहन परवाने परत आले नाही. आता वाहन नियमांचे उल्लंघन केल्यास दंड वाढल्याने वाहन परवान्यासाठी रांगा लागल्या आहेत. 
 
शासनाला पाठवला प्रस्ताव –
लखनऊला परत पाठवण्यात येणाऱ्या वाहन परवान्यासाठी गाजियाबाद रिजनल केंद्र तयार करण्यात यावे यासाठी अधिकाऱ्यांनी शासनाला पत्र पाठवले आहे. त्यांच्या समस्याचे समाधान करण्यासाठी गाजियाबादला केंद्र बनवले तर ज्याने लोकांच्या समस्याचे निदान होईल.
शासनाला प्रस्ताव पोहचला आहे, लवकरच मंजूरी मिळेल. यानंतर नोएडा, बुलंदशहर, हापुड आणि गाजियाबादमधील लोकांच्या समस्येचे समाधान होईल, लोकांना महिनोंमहिने वाट पाहावी लागणार नाही. 
विश्वजीत सिंह, एआरटीओ प्रशासन

महाराष्ट्रात ही सोय असावी

राज्यातील शहर आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आरटीओ कार्यालयातून वाहन चालविण्याचा परवाना पोस्टाने पाठविण्यात येतो. मात्र, काही कारणास्तव घरी कोणी नसल्यास किंबहूना पोस्टमनला पत्‍ता नाही सापडल्यास तो वाहन परवाना परत आरटीओ कार्यालयात जातो. त्यानंतर अनेक दिवस वाहन परवाना मिळण्यासाठी वाट पहावी लागते. उत्‍तरप्रदेशात आता 4 महिने वाट पाहण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचे धोरण सरकारने अवलंबावे अशी मागणी यापुर्वी वेळावेळी करण्यात आली आहे. मात्र, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.

 
You might also like