‘बंगाली बाला’ खुशी मुखर्जी ‘बोल्डनेस’च्या बाबतीत देते पूनम पांडे अन् शर्लिन चोपडाला ‘टक्कर’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – साऊथ सिनेमांमध्ये आपल्या बोल्डनेसनं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री खुशी मुखर्जी मुंबईत जन्माला आली आहे. खुशी आपल्या काही फोटोंमुळं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. आपल्या काही बोल्ड फोटोंमुळं खुशीनं बॉलिवूड अभिनेत्रींना बोल्डनेसच्या बाबतीत टक्कर दिली आहे.

खुशीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर खुशी एक हिंदू बंगाली परिवारातून आहे. मॉडेलिंगमुळं खुशीनं आपली फेस व्हॅल्यु तयार केली होती. यानंतर खुशी आपल्या बोल्डनेसमुळं कायमच चर्चेत आली आहे. खुशीचा जन्म मुंबईचा असला तरी पहिला सिनेमा मात्र तिनं तमिळ भाषेतील केला आहे.

खुशी मुखर्जी ही बंगाली बाला आपल्या हॉट जलव्यांसाठी सोशलवर फेमस आहे. लोकांचं म्हणणं आहे की, खुशी एवढी हॉट आहे की, आपल्या बोल्डनेसनं ती अभिनेत्री पूनम पांडे आणि शर्लिन चोपडा यांनाही टक्कर देते. खुशीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत हे फोटो हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत की, बोल्डनेसच्या बाबतीत ती साऱ्यांना मागे टाकते.

खुशीच्य वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2013 साली आलेल्या अंजलतुरई या तमिळ सिनेमात खुशीला पहिली संधी मिळाली. यानंत तिनं दोन तेलगु सिनेमात काम केलं आहे. हार्ट अटॅक आणि डोंगप्रेमा अशी या सिनेमांची नावं आहेत. साऊथमध्ये काम केल्यानंतर खुशी हिंदी टीव्हीसाठी ऑडिशन देऊ लागली.

एमटीव्हीवरील MTV Splitsvilla10 मधून तिनं टीव्हीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याआधीही तिनं जय बजरंगबली आणि सिंहासन मालिकेत लहान भूमिका केल्या होत्या. परंतु स्प्लिट्सव्हिलामधून तिनं खूप लोकप्रियता मिळवली. यानंतर 2018 साली तिनं एमटीव्ही लव स्कुल मध्ये भाग घेतला. 2019 मध्ये तिनं बालवीर रिटर्न्स मालिकेत काम केलं.

https://www.instagram.com/p/B74xPn-pF-w/

https://www.instagram.com/p/B7TO5E-Jost/

https://www.instagram.com/p/BwPwsV7pv1n/

https://www.instagram.com/p/Buk4QsTAo1j/