Kia च्या इलेक्ट्रिक कारचा मार्केटमध्ये धूमाकूळ, काही तासात सर्व युनिट्स बुक; 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 112 तर 18 मिनिटांच्या चार्जिंगवर 330 KM रेंज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील अनेक लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicles) वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेलच्या (Pollution, petrol, diesel) वाढत्या किंमतीमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक बड्या कंपन्यांनी आपली इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान कोरियन कार उत्पादक कंपनी किआ कॉर्पोरेशनने (kia Corporation/Automobile Manufacturer) त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

किआने सादर केलेल्या आपल्या पहिल्या कारने आधी कोरियन आणि युरोपियन मार्केटमध्ये (Korean and European market) धूमाकूळ घातला आहे. आता या कारला अमेरिकन बाजारात (American market) देखील ग्राहकांकडून (Customer) मोठी मागणी (Demand) होऊ लागली आहे.

काही तासास 1500 युनिट्सचे बुकिंग
किआ कार अमेरिकन बाजारात लाँच (Launch) झाल्यानंतर कंपनीने बुकिंग सुरु केली आहे. बुकिंग सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासात सर्व कार बुक झाल्या आहेत. बुकिंगच्या पहिल्या टप्प्यात 1500 युनिट्स बुकिंगसाठी ठेवण्यात आले होते. हे सर्व युनिट्स अवघ्या काही तासात बुक झाल्या. Kia EV6 कंपनीच पहिली फुल इलेक्ट्रिक कार (first full electric car) आहे. जी इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर (E-GMP) आधारीत आहे.

5 मिनिटांच्या चार्जिंगवर 112KM रेंज
कंपनीने या कारमध्ये 400V आणि 800v चा चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही एसयूव्ही (SUV) फक्त 5 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगवर (fast charging) 112 KM तर 8 मिनिटांच्या चार्जिंगनंतर 330 KM पर्यंतची रेंज देईल.

Kia कारची वैशिष्ट्ये
या कारचं फ्रंट पॅनल (Front panel) आधुनिक (modern) पद्धतीने डिझाईन (design) करण्यात आलं आहे.
EV 6 मध्ये एक शॉर्ट ओव्हरहँग (Short overhang) आहे, असं फोटोवरुन दिसून येत आहे.
कारची हेडलाईट लहान असून LED Pattern मुळे या कारला वेगळाच लुक मिळाला आहे.
नवीन इंटीरियबद्दल सांगायचे झाले तर, ऑडिओ व्हिज्युअल (Audio visual) आणि नेव्हिगेशन (AVN) स्क्रीन जी हायटेक आणि हाय डेफिनेशन क्वालिटीसह (Hi-tech and high definition quality) येते.
कारची बॅटरी पॉवर या कारला खास बनवते आणि नवीन फिलॉसफीसह या कारचं डिझाइन तयार केलं आहे.

3.5 सेकंदात 100 किमी वेग
किआ या कारची लांबी 4680 मिमी असून रुंदी आणि उंची 1550 मिमी इतकी आहे.
Kia EV6 ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायामध्ये उपलब्ध आहे.
ज्यात 58kWh आणि 77.4kWh चा समावेश आहे.
या बॅटरीच्या मदतीने ही कार अवघ्या 3.5 सेकंदात 100 किमी प्रतितास इतका वेग घेते.
याशिवाय अनेक दमदार फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.

पूर्ण बॅटरी चार्ज केल्यावर 550 KM रेंज
कारमध्ये 800 व्होल्टची चार्जिंग सिस्टम मिळते. ज्याच्या मदतीने केवळ 18 मिनिटांत ही कार 10 वरुन 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार फक्त 4.30 मिनिटं चार्ज केली तर कमीत कमी 100 किमी पर्यंत धावते. तर या कारची बॅटरी पूर्ण चार्ज केली तर ही कार 510 किमीची रेंज देते.

इलेक्ट्रिक एसयूव्ही कारचे व्हेरिएंट्स
ही इलेक्ट्रिक एसयूव्ही EV6, EV6, GT-Line आणि EV6 GT सह 3 व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. ही कार EV6 टू-व्हील ड्राइव्ह (2WD) आणि ऑल व्हील ड्राइव्हसह (AWS) सादर करण्यात आली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : kia ev6 runs 112km in 5 minute charging ev breaks all records and booked all the car in few hour

हे देखील वाचा

‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी

पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं पुण्यात मोठं विधान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा