‘नो-पार्किंग’ आणि ‘नो-चार्जिंग’ ! ‘या’ कंपनीकडून ‘भन्नाट’ इलेक्ट्रिक स्कूटर ‘लॉन्च’, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  ह्युंदाई आता एक विशेष इलेक्ट्रिक स्कूटर आणली आहे, ही स्कूटर इतर कंपन्यांच्या स्कूटरच्या मानाने जरा हटके असणार आहे. कंपनीने ही कार खरेदीदारांना सवलत म्हणून देण्याचा उद्देशाने लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची खासियत म्हणजे ही स्कूटर पार्क करण्यासाठी तुम्हाला कुठेही पार्किंग शोधण्याची गरज भासणार नाही.  अशा प्रकारे ही स्कूटर तयार करण्यात आली आहे. यात रेअर आणि फ्रंट लाइट तसेच बँटरी देण्यात आली आहे. 


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कार पार्किंग केलेल्या ठिकाणापासून इतर ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही या स्कूटरचा वापर करु शकतात. ह्युंदाई आणि किओ या कारच्या खरेदीवर ही स्कूटर ग्राहकांना देण्यात येईल. या स्कूटरमध्ये 10.5 Ah ची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे, ही बॅटरी एकदा चार्ज केल्यास ही स्कूटर 20 किलोमीटर अंतर कापेल. 
 
ही आहे खासियत –
कार चालवताना तुम्ही ही स्कूटर तुमच्या कारमध्ये नेऊ शकतात. कार चालू असताना ही स्कूटर नियोजित ठिकाणी ठेवल्यास आपोआप चार्ज होईल. या स्कूटरचे वजन फक्त 7.7 किलो ग्राम आहे. एवढेच नाही तर ही स्कूटर 3 ठिकाणांहून दुमडता देखील येेते. यानंतर तुम्ही ती हातात घेऊन देखील फिरु शकतात.

या स्कूटरमध्ये 1 डिजीटल डिस्प्ले देण्यात आला आहे. यात स्कूटरच्या चार्जिंगची आणि वेगाची माहिती यावर मिळेल. रात्रीच्या वेळी प्रवास करताना अडचणी येऊ नये म्हणून स्कूटरला हेड आणि टेल लाइट देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –