पोलीसनामा ऑनलाईन टीम – Kiara Advani | बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) सोशल मीडियावर सतत सक्रिय बघायला मिळते. खाजगी आयुष्यासोबतच ती वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील नेटकऱ्यांच्या चर्चेत पाहायला मिळते. तिचे वैयक्तिक आयुष्य प्रगतीच्या पथावर आहे.
कियारानं नुकतीच एक कार घेतली आहे. तिच्या कारची किंमत जवळपास 1.58 कोटी रुपये इतकी आहे. तिनं Audi A8L Luxury Sedan ही कार खरेदी केली आहे. कंपनीने कियाराचे (Kiara Advani) फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री कियारा तिच्या नवीन ऑडी कार सोबत दिसत आहे.
कियारानं घेतलेली ही कार जगातील तीन नंबरची गाडी आहे. तिला कार कलेक्शनची अगदी आवड आहे. आतापर्यंत तिच्याकडे BMW X5, Mercedes-Benz-Class, BMW 530d चा समावेश आहे. तिनं घेतलेली ही गाडी गेल्यावर्षी 2020 मध्ये भारतात लॉन्च करण्यात आली होती, तर सर्वप्रथम त्या गाडीची किंमत 1.56 कोटी इतकी होती.
दरम्यान, कियारा आडवाणीनं 2014मध्ये ‘फगली’ या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिनं ‘एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी’, ‘लक्ष्मी’, ‘कबीर सिंग’ आणि ‘शेरशहा’ या चित्रपटामध्ये तिनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात चांगलंच घर निर्माण केलं आहे.
Web Title :- Kiara Advani | actress kiara advani bought audi a8l luxury sedan
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
BJP-MNS Alliance | पुणे महापालिकेसाठी भाजप-मनसे युती नाही?, राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीने परिधान केला इतका टाईट ड्रेस की झाली ‘Oops Moment’ ची शिकार