Kiara Advani And Sidharth Malhotra Wedding | सिद्धार्थच्या आईने कियाराबद्दल केलेल्या ‘त्या’ व्यक्तव्याने वेधले सर्वांचे लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kiara Advani And Sidharth Malhotra Wedding | बॉलीवूडमध्ये सध्या लगीनघाई दिसत आहे. अलीकडेच अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे लग्न पार पडले. आता त्यांच्या पाठोपाठ बॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. जैसलमेरमधील एका आलिशान महालात यांचा विवाह पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या महालाचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. आता दोन्ही कुटुंब लवकरच विवाह स्थळी पोहोचणार आहेत. यादरम्यान कियाराची सासू आणि सिद्धार्थच्या आईने होणाऱ्या सुनेबद्दल केलेले भाष्य सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (Kiara Advani And Sidharth Malhotra Wedding)

 

कियारा आणि सिद्धार्थ या दोघांचे कुटुंबीय सध्या जैसलमेरमध्ये जाण्यासाठी रवाना झाले आहेत. 5 किंवा 6 फेब्रुवारी दरम्यान जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेस मध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. जैसलमेर विमानतळावर सिद्धार्थचे कुटुंबीय आढळून आले. यावेळी सिद्धार्थचा भाऊ हर्षद आणि त्याची पत्नी आणि सिद्धार्थची आई हे तिघेही विमानतळावर स्पॉट झाले. त्यावेळी उपस्थित असलेल्या पापाराझींनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. तर यातीलच एका पापाराझीनी सिद्धार्थच्या आईला विचारले की “कियारा तुमची सून होणार आहे तुम्हाला कसं वाटतंय?” या पापाराझीच्या प्रश्नाला उत्तर देताना सिद्धार्थची आई म्हणाली “मी फारच उत्साहीत आहे”. यानंतर तिने काही बोलणे टाळले. मात्र तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सिद्धार्थच्या आई बरोबरच सिद्धार्थचा भाऊ हर्षद यांनीही त्यांच्या लग्नाबद्दल आनंद व्यक्त केला
“मी माझ्या भावाच्या लग्नासाठी फारच उत्सुक आहे” असेही यावेळी ते म्हणाले.
अनेक दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत होत्या.
मात्र कुटुंबीयांनी याबाबतची कोणती अधिकृत माहिती दिली नव्हती.
तर आता सूर्यगड पॅलेस लग्नासाठी सज्ज करण्यात आले आहे.
मोजकेच कुटुंबीय आणि मित्रमंडळी या लग्नात उपस्थित असणार आहेत.

 

Web Title :- Kiara Advani And Sidharth Malhotra Wedding | kiara advani and sidharth malhotra wedding groom actor mother said for kiara becoming their daughter in law

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aurangabad Crime News | सुसाईड नोट लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; औरंगाबादमधील घटना

Raigad District Bank Fire | रायगड जिल्हा बँकेला भीषण आग; कागदपत्रे एका क्षणात जळून खाक

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास