कियारा आडवाणीचा रिलेशनशीप बाबत मोठा खुलासा, म्हणाली…

मुंबई: ‘कबीर सिंग’, ‘गुड न्यूज’ आणि ‘लक्ष्मी’ यांसारख्या धमाकेदार चित्रपटात दिसणारी कियारा आडवाणी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कियारा कोणालातरी डेट करत आहे. या विषयावर ती कधीही उघडपणे बोली नाही, परंतू बऱ्याचदा ती बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली आहे. म्हणून लोकांनी सिद्धार्थला कियाराचा रोमॅंटिक बॉयफ्रेंड म्हणण्यास सुरवात केली आहे. दोघे एकत्र सुट्टीवर जातात आणि रात्रीचे जेवणही सोबत करत. दोघेही एकमेकांना चांगले मित्र सांगतात. पण आता कियाराने आपल्या नात्याचा खुलासा केला आहे.

कियारा आडवाणीने सिद्धार्थ मल्होत्राचे नाव न घेता सांगितले की ती एका अभिनेत्यासोबत डेट करत आहे. सध्याच कियारा आडवाणी फिल्मफेअरच्या मॅगझीन कव्हरवर आल्या होत्या आणि इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी डेट करत असल्याचे जाहीर केले. त्यांना विचारण्यात आले होते की त्यांनी कोणाला डेट केले होते. यावर कियारा यांनी उत्तर दिले, ”शेवटच्या वेळी जेव्हा मी डेटवर गेली होती… यावर्षी त्याच्यासोबत मी काही वेळ गेली होती आणि या वर्षी फक्त दोन महिने तर तुम्ही तुमचा गणित करू शकता.”

कियाराला विचारले की जेव्हा तुम्हाला कळेलं की तुमचा बॉयफ्रेंड तुमच्यासोबत चीट करीत असेल तर तुम्ही काय कराल? त्यावर कियारा म्हणाल्या की मी त्याला ब्लॉक करून देईल आणि कधी मागे वळून पाहणार नाही. कधीही माफ करणार नाही आणि परतही जाणार नाही.

कियारा आडवाणी नेहमी सिद्धार्थ मल्होत्राच्या घरासमोर थांबत असते. मालदीववरून आल्यानंतर कियारा जानेवारीमध्ये सिद्धार्थच्या आई बाबांना भेटली होती. याआधी कियारा आदित्य शीलसोबत वर्कफ्रंटच्या ‘इंदू की जवानी’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती ‘शेरशाह’ चित्रपटात सिध्दार्थसोबत दिसणार आहे. याशिवाय कियारा या दिवसात ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या शूटिंगला आहे. या चित्रपटात ती वरून धवनच्या अपोजिटमध्ये दिसणार आहे. फिल्ममध्ये अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.