‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेटफ्लिक्सची पॉप्युलर वेब सीरीज लस्ट स्टोरीजमधील अभिनेत्री कियारा आडवाणीचा व्हायब्रेटर सीन चांगलाच चर्चेत राहिला आहे. परंतु कियाराने या सीनची तयारी नेमकी कशी केली होती याबाबत तुम्हाला माहीत आहे का ? नक्कीच अनेकांना याबाबत कल्पना नसेल. हा सीन कॅमेऱ्यासमोर इतका छान कसा शुट झाला याबाबत कियाराने स्वत: खुलासा केला आहे. या सीनच्या आधी कियारा खूपच नर्व्हस होती असेही तिने सांगितले.

नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये बोलताना कियाराने सांगितले की, “करण जोहरने या सीनला करण्यासाठी वेगवेगळे प्रकार सांगितले. त्याची अशी इच्छा होती की, मी या सीनला न घाबरता करू. करण म्हणाला होता की, स्क्रीनवर व्हायब्रेटरवाल्या सीनचा छोटासाच भाग दाखवला जाईल. या सीनवर मी हसू नये असे त्याला वाटत होते. या सीनच्या एक दिवस आधी मी खूपच नर्व्हस होते. खरेतर हा सीन करण्यासाठी माहिती मिळावी म्हणून मी गुगलवर सर्चही केलं होतं. मला जाणून घ्यायचे होते की, लोकं व्हायब्रेटरचा वापर कसा करतात. हे नेमकं काय आहे हे माहीत करून घेण्यासाठी मी ‘द अग्ली ट्रुथ’ सारख्या सिनेमातील काही सीनही पाहिले.”

करणने दिलेल्या सल्ल्यावरही कियाराने चर्चा केली. तिने सांगितले की, “मी हा सीन ईमानदारीने करावा असा सल्ला करणने मला दिला होता.” लस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्ये कियाराने विक्की कौशलच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

आरोग्य विषयक वृत्त – 

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव

नवजात बाळांच्या ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

Loading...
You might also like