कोरोनाची दहशत ! कियारानं 7 दिवसांमध्ये 2 वेळा करून घेतली ‘टेस्ट’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. त्यातच सातत्याने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची बाधा होत आहे. यामुळे अभिनेत्री कियारा अडवाणी चांगलीच घाबरली आहे. आपल्याला कोरोना तर झाला नाही ना या भीतीने तिने दोन वेळा कोविडची टेस्ट करून घेतली आहे. सुदैवाने दोन्ही वेळा तिची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

काही दिवसांपूर्वी कियारा आणि तब्बू यांनी कार्तिक आर्यनबरोबर भूल भुलैया -2 या सिनेमाचे चित्रिकरण केले होते. कार्तिकचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कियारा, तब्बू या दोघींबरोबरच या सिनेमाचा दिग्दर्शक अनिझ बझ्मी अशा तिघांची कोरोना टेस्ट झाली होती. या तिघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे तिने सुटकेचा निःश्वास सोडला होता. यापूर्वी काही दिवसांपूर्वी जुग जुग जियो या सिनेमात कियारासोबत काम करत असलेल्या वरुण धवन आणि नितू कपूर यांनाही करोनाची बाधा झाली होती. तेंव्हा देखील कियाराची टेस्ट केली होती. सुदैवाने ही टेस्ट निगेटिव्ह आली होती.

 

 

 

दरम्यान अभिनेता आमिर खानची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तो सध्या घरातच क्वारंटाईन झाला आहे. कियारा काही दिवसांपूर्वी आमिर सोबत एका जाहिरातीत काम केले होते. आता आमिरची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने कियाराची पुन्हा टेस्ट केली जाणार का, अशी चर्चा होत आहे.