अभिनेत्री कियारा – सिध्दार्थ रात्रीच्या पार्टीनंतर एकत्र ‘स्फॉट’, अफेअरची चर्चा पुन्हा ‘गरम’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कियारा आडवाणीने बुधवारी आपला ३७ वा वाढदिवस साजरा केला. तिने बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटींना मोठी पार्टीही दिली. तिच्या बर्थडे पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

कियारा आपल्या बर्थ डे सेलिब्रेशनवेळी आपल्या पॅरेंट्ससोबत आली होती. परंतु ती पार्टीतून परत जाताना मात्र अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली. अशा बातम्या समोर येत आहेत की, सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना डेट करत आहेत. समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, कियारा आणि सिद्धार्थ गाडीत बसून निघून जातात. सध्या हा व्हिडीओ आणि काही फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहेत.

पार्टीत कियारा आणि सिद्धार्थ यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दोघेही एकत्र दिसल्यानंतर कियारा खूपच लाजताना दिसत होती. सिद्धार्थही खूप स्माईल करताना दिसून आला. दोघांनी कॅमेऱ्यासमोर पोज देणं टाळलंच.

सध्या दोघांच्या अफेअरला घेऊन खूप चर्चा सुरु आहे. जेव्हापासून दोघे सतत एकत्र दिसू लागले तेव्हापासून दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. परंतु दोघांनीही ही बाब नाकारली आहे. आगामी सिनेमा शेरशाहमध्ये दोघेही एकत्र दिसणार आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ लवकरच जबरिया जोडी सिनेमात दिसणार आहे. यात परिणिती चोपडा असणार आहे. दोघेही आपल्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. कियाराबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अक्षय कुमारच्या गुड न्यूज सिनेमात दिसणार आहे. यात दिलजीत दोसांझ आणि करीना कपूरही दिसणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –