Video : ‘या’ 3 कामात येते ‘सेक्स’पेक्षाही जास्त मजा – कियारा आडवाणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी (Kiara Advani) आपल्या सिनेमा आणि अभिनयामुळं कायमच चर्चेत येत असते. सध्या कियारा तिचा आगामी सिनेमा लक्ष्मी (Laxmii) मुळं चर्चेत आहे. कियाराचा लक्ष्मी सिनेमाच्या प्रमोशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात तिनं अशा 3 गोष्टींबद्दल सांगितलं आहे ज्यात तिला सेक्सपेक्षाही जास्त मजा येते.

ट्विक इंडियानं कियाराचा हा व्हिडीओ इंस्टावरून शेअर केला आहे. कियारा अनेक मजेदार प्रश्नांची उत्तरं देताना दिसत आहे. यात कियाराला विचारण्यात आलं की, अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या सेक्सपेक्षाही चांगल्या वाटतात.

या प्रश्नाचं उत्तर देताना कियारा म्हणाली, शानदार पिझ्झा, शॉपिंग आणि एक चांगला सिनेमा. या 3 गोष्टी कियाराला सेक्स पेक्षाही जास्त मजेदार वाटतात असं तिचं म्हणणं आहे.

यावेळी एका प्रश्नाचं उत्तर देताना कियारानं सांगितलं की, आयुष्यात ती एकदा मरता मरता वाचली आहे. कियारानं सांगितलं की, ती कॉलेजात असताना क्लासमेट्ससोबत ट्रीपवर गेली होती. तेव्हा तिच्या रूममध्ये आग लागली होती. यातून ती वाचणार नाही असं तिला वाटलं होतं. ही घटना खूप भयानक होती असंही तिनं सांगितलं.

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गुडन्यूजनंतर आता तिच्यकडे अनेक सिनेमे आहेत. कियारा लक्ष्मी, इंदू की जवानी, भूल भुलैया 2 आणि शेरशाह अशा अनेक मोठ्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. गुड न्यूजनंतर कियारा आणि अक्षय कुमार लक्ष्मी सिनेमात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.