पोलीसनामा ऑनलाईन : Kiara Advani | 21 जानेवारी 1986 रोजी पाटणा येथे जन्मलेल्या सुशांत सिंह राजपूतने ‘काई पो चे’ चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला. महेंद्र सिंग धोनीचा बायोपिक ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ मधील सुशांतच्या अभिनयाने सर्वांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. पण त्याच्या अचानक जाण्यामुळे चाहत्यांना एकच धक्का बसला. सुशांत सिंग राजपूत हा 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या वांद्रेमधील घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या केली असं प्रथमदर्शी म्हंटले गेलं. सुशांतच्या मृत्यूची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय करत आहे. अजूनही त्याच्या या केसला पूर्णविराम लागलेला नाही. आज सुशांतचा वाढदिवस आहे. (Kiara Advani)
बॉलिवूडमधील बरीच मंडळी सुशांतबद्दल भरभरून बोलतात, व्यक्त होतात. मध्यंतरी अभिनेत्री कियारा अडवाणीने (Kiara Advani) सुशांतच्या एका सवयीचा खुलासा केला होता. एमएस धोनी: द स्टोरी अनटोल्ड या चित्रपटातील सह-अभिनेत्री कियारा अडवाणीने एकदा यू – ट्यूबर रणवीर अल्लाबदिया यांच्या ‘बियर बायसेप’ चॅनलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने सुशांतच्या आयुष्यातील एक खुलासा केला आहे.
सुशांत हा निद्रानाशाचे शिकार होता. सुशांत रात्री फक्त दोन तास झोपायचा. कियारा (Kiara Advani) म्हणाली,.
मी शूटिंगनंतर प्रचंड थकायची आणि कधी एकदा झोपते असं व्हायचं, पण याबाबतीत मात्र त्याचं मत वेगळं होतं.
तो म्हणायचा की मानवी शरीराला केवळ 2 तास झोप पुरेशी असते. तुम्ही जेव्हा 7 ते 8 तास झोपता त्यावेळीसुद्धा तुम्ही जागेच असता, वास्तविक पाहता तुमचा मेंदू हा या 7 ते 8 तासांपैकी फक्त 2 तासच शांत झोपलेला असतो. बाकीचे तास तुम्ही जरी झोपलेले असाल तरी तुमचा मेंदू कार्यरत असतो, हे त्याने मला सांगितलं. पण दोन तास झोपूनही तो दुसऱ्या दिवशी तितकाच उत्साही असायचा. सेटवर तो अजिबात कंटाळलेला नसायचा. निदान माझ्यासाठी तरी ही खूपच चकित करणारी गोष्ट होती.
Web Title :- Kiara Advani | once kiara advani revealed habit of sushant singh rajput she said he was insomniac
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ajit Pawar | पार्थ पवार – शंभूराज देसाई भेटीवर बोलले अजित पवार; म्हणाले…