Kiara Advani – Sidharth Malhotra | सिद्धार्थ-कियाराचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल; बॉलिवूड गाण्यांवर थिरकले कपल

पोलीसनामा ऑनलाइन : सध्या बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीची (Kiara Advani – Sidharth Malhotra) लगीन घाई सुरू झाली आहे. सोशल मीडियावर सर्वत्र त्यांच्याच लग्नाची चर्चा दिसत आहे. सिद्धार्थ आणि कियारा 7 फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकणार आहेत. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा आलिशान लग्न सोहळा पार पडणार आहे. या लग्न सोहळ्याला अनेक बॉलीवूडमधील सेलिब्रिटी देखील हजेरी लावणार आहेत. आता त्यांच्या लग्नाआधी कियारा आणि सिद्धार्थचे (Kiara Advani – Sidharth Malhotra) काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना आजपासून सुरुवात होणार आहे. आज होणाऱ्या संगीत सोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ ही समोर आला आहे. तर आता सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि कियाराचा एक डान्स व्हिडिओ जोमात वायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ आणि कियारा बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

सिद्धार्थ आणि कियाराचा (Kiara Advani – Sidharth Malhotra) हा डान्स व्हिडिओ त्यांच्या
संगीत सोहळ्यातील नसून एका पार्टीतील असल्याचे समोर आले आहे.
हा व्हिडिओ जुना असून काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सिद्धार्थ कियाराच्या लग्नासाठी जैसलमेर मधील सूर्यगढ पॅलेस मधील 84 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर पाहुण्यांसाठी 40 गाड्या व सुरक्षिततेची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
तर या आलिशान पॅलेसमध्ये सिद्धार्थ आणि कियारा त्यांच्या कुटुंब आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह
बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Web Title :- Kiara Advani – Sidharth Malhotra | siddharth malhotra kiara advani wedding couple dancing on bollywood song old video goes viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sujay Vikhe-Patil | नाशिक पदवीधर मतदारसंघातील राजकारण बाळासाहेब थोरात यांच्या सहमतीनेचं; खासदार सुजय विखे-पाटील यांचा खळबळजनक दावा

Pune Kasba Peth Bypoll Election | जाती-धर्माच्या भिंतीपालिकडला ‘आपला माणूस’ रविंद्र धंगेकर यांना काँग्रेस कडून कसबा मतदार संघातून उमेदवारी; महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन करत भरला धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज

Rohit Pawar | रोहित पवारांचा BJP ला टोला; म्हणाले – ‘ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देणे हा भाजपचा डाव…