‘रॅप’ गाता गाता आली लहर, केला कहर…! अभिनेत्री कियारा आडवाणीचा ‘हा’ व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आजकाल सगळेच सोशल मिडियाचा पुरेपुर वापर करतात. मिडियाच्या माध्यमातून सर्वजन काहीना काहीतरी उद्योग करत असतात. त्यामध्ये फोटो, व्हिडीओ किंवा मेसेज शेअर करुन आपल्या भावना व्यक्त करत असतात. यामध्ये अभिनेत्रीही मागे पडल्या नाहीत. त्याउलट त्या मिडियावर सतत अपटेड राहत असतात. काहीतरी विचित्र करत असतात. जे आपण कधी स्वप्नातही करु शकत नाही. असे काय केले असेल या अभिनेत्रीने जाणून घेऊया…

 

अभिनेत्री कियारा आडवाणी हिने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने चक्क तिचे मोठे केस स्वतः कापले आहे. याचे कारण देखिल तिने सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये तिने रॅप करताना स्वतः केस कापत आहे. केस कापण्याचे कारण तिने सांगितले.

 

कियारा म्हणते की, मी माझ्या मोठ्या केसांची काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे केस कापत आहे. मला माझे केस खुप आवडतात. पण शुंटिंगच्या वेळी केसांवर वेगवेगळे लुक दिसण्यासाठी रासायनिक उत्पादकांचा वापर केला जातो. त्यामुळे केस खराब ही होतात. यामध्ये मला केसांची काळजी घेण्यासाठी वेळ नाही. जरी माझे विचार वेगळे असले तरी मी परंपरेचे पालन करते. मी केस कापल्यानंतर हा लुक मला कसा दिसतो ? ते पाहू..

अभिनेत्री कियारा आडवाणी हीचा आगामी चित्रपट लवकरच येत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शाहिद कपुर व कबीर सिंग दिसणार आहे. त्याचबरोबर मुख्य भूमिकेत करीना कपुर, अक्षय कुमार व दलजीत दोसांझ ही दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा दारुच्या नशेत वाहून गेलेला सर्जन याची आहे. जो प्रेमात अपयशी ठरल्यावर स्वतः ला पुर्णपणे बर्बाद करण्याचे ठरवितो. हा चित्रपट दक्षिणात्य चित्रपट अर्जुन रेड्डीचा रिमेक आहे.