पावसातही कियारा आडवाणी आणि अदितिची दिसली ‘स्टाईल’, कार्तिक-रिया आणि सिध्दार्थ दिसले ‘रंगात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कबीर सिंहच्या यशा नंतर कियारा आडवाणीच्या करियर मध्ये एक महत्त्वाचे वळण आले आहे. कियाराची प्रसिद्धी सध्या जोरात होत आहे. मुंबई विमानतळावर काढलेल्या एका फोटो मध्ये कियारा एका नव्या अंदाजात दिसली. नेहमी डिझायनर ड्रेस मध्ये दिसणारी कियारा यावेळी कलरफुल ट्रैक सूट मध्ये दिसून आली.

‘जबरिया जोडी’ या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा सध्या व्यस्त आहेत. आपल्या सात वर्षाच्या करियर मध्ये नेहमी संघर्ष करणाऱ्या सिद्धार्थला सध्या या चित्रपटाकडून खूपच अपेक्षा आहेत. याव्यतिरिक्त सिद्धार्थकडे आजून दोन चित्रपट आहेत. पहिला ‘मरजावां’ आणि दुसरा विक्रम बत्राचा बायोपिक ‘शेरशाह’

सुशांत सिंह राजपूत सोबत वाढदिवस साजरा केल्या नंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत आली होती. शेवटी जलेबी चित्रपटतात दिसलेली रिया लवकरच आणखीन दोन चित्रपटात दिसणार आहे. ‘धांसु रासी नेयरगले’ या तमिळ चित्रपटातून रिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अमिताभ बच्चन सोबत ‘चेहरा’ चित्रपटात रिया महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

यंगस्टर्स चे फेवरेट कार्तिक आर्यन सुद्धा मुंबई मध्ये स्पॉट झाले. इम्तियाज अलीच्या चित्रपटाची शूटिंग संपवून कार्तिक दुसऱ्या चित्रपटाच्या तयारीत आहे. ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटाचा शेड्युल लवकरच लखनौ मध्ये सुरु होणार आहे. करण जौहरचा ‘दोस्ताना 2 ‘ चित्रपटही कार्तिककडेच आला आहे.

सिंगर नेहा कक्कड़चा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली मुंबई मध्ये फिरताना दिसला. कॅमेरा पाहताच हिमांशने फोटोसाठी पोज दिला. ‘यारिया’ चित्रपटानंतर हिमांशूचे अनेक चित्रपट आले पण एकही चित्रपट बॉक्स ऑफिस वर हिट झाला नाही. यावरून हे लक्षात येते की कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीसाठी फिल्म इंडस्ट्री मध्ये घुसणे किती कठिण असते.

राजसी घराण्यातून आलेली आणि सिम्पल ब्युटी म्हणून ओळखली जाणारी अदिति राव हैदरीलाही मायानगरी मध्ये स्पॉट केला गेला. तेव्हा आदिती एक वेगळ्या अंदाज मध्ये दिसून आली. काळा टीशर्ट आणि डेनिमच्या हॉट पैंट मध्ये आदिती पावसातही हॉट दिसत होती. आदिती सध्या तमिळ आणि तेलुगू इंडस्ट्री मध्ये काम करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘दुधा’चा असा उपयोग केल्यास होतील ‘फायदे’च फायदे

८ आठवड्यांत घटवा वाढलेले ‘वजन’, ‘या’ आहेत विशेष टिप्स

दररोज ‘दुध’ प्या आणि ‘पोहे’ खा, आरोग्य राहिल उत्तम !

सिने जगत

Video : टीका करणाऱ्यांना फाट्यावर मारत सोफीया हयातने पुन्हा शेअर केले ‘तसेल’ फोटो, व्हिडीओ !

Video : अभिनेत्री ईशा गुप्ताच्या ‘हॉटनेस’ने सोशलवर ‘आग’ !

गौरी खाननं केला ‘गौप्यस्फोट’; सांगितलं ‘सुपरस्टार’ची पत्नी होणं किती अवघड असतं

बहुजननामा

विद्यार्थ्‍यांमध्‍ये बालवयातच वृक्षप्रेम व पर्यावरण विषयक जाणीव रुजवावी : जिल्‍हा‍धिकारी जितेंद्र पापळकर

अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी जाहीर करा

मोदी दोन मंदिरात गेले, तर केसीआर ६ मंदिरात जातील – ओवैसी