‘बेबो’ करीनाच्या भावाच्या लग्नात ‘कियारा’नं केला जोरदार ‘डान्स’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कपूर कुटुंबातील स्टार अरमान जैन आणि अनीसा मल्होत्रा यांच्या लग्नात अनेक दिग्गजांनी उपस्थिती दाखवली होती. बिग बी अमिताभपासून तर किंग शाहरुख खानपर्यंत सर्वच कलाकार आले होते. या लग्नात करीना कपूर पासून तर किंग खानपर्यंत सर्वांनीच डान्स परफॉर्मंस दिला होता. हे लग्न सोशलवर खूप ट्रेंड करताना दिसलं. अशात कियारा आडवाणीचा एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. तिनं तिच्याच एका गाण्यावर डान्स केला आहे.

व्हिडीओत दिसत आहे की कियारा गुड न्यूज सिनेमातील सौदा खरा खरा गाण्यावर डान्स करत आहे. कियाराच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं केस मोकळे सोडले आहेत. तिच्या गळ्यात कुंदन नेकलेस घातला आहे. कियाराचं सादरीकरण सर्वांनाच खूप आवडलं आहे. कियाराच्या डान्सचा व्हिडीओ सोशलवर खूप व्हायरल होताना दिसत आहे. कियारा व्यतिरीक्त करिश्मा कपूर, करीना कपूर, शाहरुख खान, गौरी खान, करण जोहर, तारा सुतारिया अशा अनेक स्टार्सनी या रिसेप्शनमध्ये डान्स केला आहे.

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती गुड न्यूज सिनेमात दिसली होती. याशिवाय ती लक्ष्मी बॉम्ब, इंदू की जवानी, भूल भूलैया 2 आणि शेरशाह अशा अनेक मोठ्या सिनेमात दिसणार आहे. गुड न्यूजंतर कियारा आणि अक्षय कुमार लक्ष्मी बॉम्ब सिनेमात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.