300 कोटीचा ‘गल्ला’ जमविणार्‍या सिनेमाची अभिनेत्री कपड्यांवर करते फक्त ‘एवढा’ खर्च

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टरा कियारा आडवाणी सध्या आपल्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. लवकरच तिचा गुडन्यूज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या निमित्तानं कियाराची वेगवेगळी स्टाईल करताना दिसत आहे. नुकतीच प्रमोशनदम्यान कियारा एका ड्रेस मध्ये दिसली. तिच्या या ड्रेसची खूप चर्चा झाली.

कियाराच्या या ड्रेसची चर्चा होण्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे ड्रेसचा कलर, स्टाईल आणि त्याची किंमत. कियाराच्या ड्रेसची किंमत पाहिली तर तुम्हालाही कळेल कियारा आपल्या ड्रेसिंगसाठी किती खर्च करते. नुकतीच कियारा सिनेमाचं प्रमोशनदरम्यान तिनं स्टायलिश ग्रीन कलरचा शिमरी ड्रेस घातला होता. या ड्रेसला डीप गळा होता याशिवाय त्यावर एक चमचमतं जॅकेटही होती.

एका रिपोर्टनुसार कियाराच्या या जॅकेटची किंमत 14,164 आणि पँटची किंमत तब्बल 17,750 इतरी आहे. यावर तिनं कोणतीही अ‍ॅक्सेसरीज घातली नव्हती. कियाराच्या ड्रेसची किंमत 31 हजारांहून अधिक आहे.

या हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये कियारा खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. चाहत्यांनाही कियारानं आपल्या सौंदर्यानं भुरळ पाडली. कियाराचा हा निराळा अंदाज पाहून चाहत्यांनी तिला तोतापरी हे खास नाव दिलं.

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर फग्ली या सिनेमातून तिनं बॉलिवूड मध्ये एन्ट्री केली होती. हा सिनेमा फ्लॉप झाला. परंतु तिनं हार नाही मानली. एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात कियारा सर्वांच्या नजरेत भरली. यानंतर तिनं लस्ट स्टोरी या वेब सीरीज मध्ये काम केलं. ही सीरीज खूप गाजली. कियाराला भरपूर लोकप्रियता मिळाली. कियारा नुकतीच कबीर सिंग या सिनेमात झळकली. हा सिनेमा प्रचंड हिट झाला. यानंतर आता कियाराचा गुडन्यूज हा आगामी सिनेमा 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.