‘कियारा’ नाही अभिनेत्रीचं खरं नाव, तिसर्‍या वेळेस बदलण्याचं ‘रहस्यमय’ कारण आलं समोर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कबीर सिंग या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री कियारा अडवाणीकडे सध्या मोठं- मोठे चित्रपट आहेत. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी कियारा अडवाणी यांना दुसर्‍या नावाने ओळखली जात असे. चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी कियाराचे नाव आलिया अडवाणी होते. पण सलमान खानच्या सल्ल्यामुळे तिने आपले नाव बदलले. आता लोक तिला बर्‍याच वर्षांपासून कियारा म्हणून ओळखतात. परंतु या सर्वांमध्ये कियाराला सरकारी कागदपत्रांमधील तिच्या नावामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागले.

कियाराने सांगितले की, तिने अद्याप पासपोर्ट आणि आधार कार्डमध्ये आपले नाव बदललेले नाही. यामध्ये तिचे नाव अद्यापही आलिया अडवाणी आहे. ‘जेव्हा मी परदेशात जाऊन विमानतळावर येते तेव्हा लोक मला प्रश्न विचारतात, तुम्ही कियारा आहात ? त्यामुळे आता मला वाटते की, मी लवकरच माझ्या पासपोर्ट आणि आधार कार्डमधील नाव बदलेन. पण माझे मिडल नेम आलियाच राहील. kiaraaliaadvani राहील, जसे माझ्या इन्स्टाग्रामवर कायम आहे. ‘

या दिवशी रिलीज होणार कियाराची गुड न्युज :
कियारा अडवाणीचा चित्रपट गुड न्यूज शुक्रवारी २७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. सरोगसीवर आधारित या चित्रपटात अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजित दोसांझ कियाराच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर लोकांना यापूर्वीही आवडला आहे. आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

कियाराचे चार मोठे प्रकल्प :
वर्क फ्रंटवरील कियारा गुड न्यूजशिवाय पुढील वर्षी बर्‍याच चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. गुड न्यूजशिवाय तिच्याकडे लक्ष्मी बॉम्ब, इंदू की जवानी, भूल भुलैया 2 आणि शेरशहासारखे मोठे प्रकल्प आहेत. कियारा लक्ष्मी बॉम्बेमध्ये पुन्हा एकदा अक्षयसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/