…म्हणून सिनेमापेक्षा कियारा आडवाणीच्या ड्रेसचीच वाढीव ‘चर्चा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शाहिद कपूर आणि कियारा आडवणी यांचा कबीर सिंह हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडत आजही सिनेमा आपला जलवा दाखवत आहे. या सिनेमाने 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. शाहिद आणि कियारा यांनी या सिनेमाचे प्रेमोशनही जोरदार केले आहे. कियारा अनेक वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये दिसली आहे. कियाराचा एक आऊटफिट चर्चेचा विषय ठरला आहे. कियाराचा मीडी ड्रेस चागंलाच गाजला. याचे कारण म्हणजे या ड्रेसची डिझाईन आणि अवाक करणारी किंमत.

कियाराने घातलेल्या या ड्रेसची खासियत म्हणजे हा ड्रेस थाय हाय स्लिट आणि मिड-रिफजवळ कटआऊट असलेला होता. कियारा या ड्रेसमध्ये खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती. कबीर सिंहने केलेल्या भरघोस कमाईनंतर कियारा आणि शाहिदने एकत्र पार्टी केली. या पार्टीवेळी कियाराने मीडी ड्रेस परिधान केला होता.

या ड्रेससोबतच कियाराने आपला लुक खूपच सिंपल ठेवला होता. यावर कोणतीही अॅक्सेसरीज नव्हती. तिने यावेळी लाईट मेकअपही केला होता. कियाराने हाय पोनीटेल केली होती. कियाराचा हा ड्रेस चांगलाच चर्चेचा विषय ठरला. कियाराचा हा स्पेशल ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रबल गुरुंग यांनी डिझाईन केला होता. यावेळी कियाराने चेकर्ड ड्रेससोबत क्रिस्चियन लुईबुटीनचा न्यूड कलरचे पंप स्टाईल शूजही घातले होते.

कियाराच्या या स्पेशल ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच अवाक व्हाल यात शंका नाही. प्रबल गुरुंगने डिझाईन केलेल्या या मीडी ड्रेसची किंमत 1077 डॉलर म्हणजेच जवळ जवळ 74 हजार रुपये आहे. तिच्या ड्रेसच्या किंमतीमुळेच ड्रेस चर्चेचा विषय बनला आहे.

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

You might also like