कियारा आडवाणी झाली Oops मुव्हमेंटची ‘शिकार’ ; VIDEO VIRAL

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कियारा आडवाणी आपल्या हॉट लुकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कियारा आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकत असते. तिचा आगामी सिनेमा कबीर सिंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात शाहिद कपूर सोबत दिसणार आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे आणि हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत कियारा उप्स मुव्हमेंटची शिकार होताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

व्हिडीओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, कियारा हॉट वनपीसमध्ये दिसत आहे. मीडियासमोर कियारा छान पोज देताना दिसत आहे. यादरम्यान ती पायऱ्या चढून वर जाते आणि पोज देण्यासाठी वळते तेव्हा ती उप्स मूव्हमेंटचा शिकार होते. परंतु प्रसंगावधान राखत ती वेळीच स्वत:चा ड्रेस सांभाळते. या व्हिडीओत कियारा खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. तिचे स्टायलिश वनपीस घातला आहे.

सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे. चाहते हा व्हिडीओ वारंवार पहात आहेत. काही तासांतच हा व्हिडीओ तब्बल दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरून एका अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.