मुलाच्या हव्यासापोटी 6 वर्षीय मुलीची केली हत्या, अंधश्रध्देचा बळी ठरली चिमुकली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केवळ मुलगा हवा म्हणून अंधश्रध्देच्या पोटी वडिलांनी आपल्या सहा वर्षाच्या एकुलत्या एक मुलीचा बळी दिला आहे. झारखंडमधील लोहरदगा जिल्ह्यातील पेशरार प्रखंड मुख्यालय पंचायतच्या बोंडोबार गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वडिलाला अटक केली आहे.

सुषमा नागेसिया (वय 6) असे बळी दिलेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर सुमन नागेसियाने (वय 26) असे अटक केलेल्या नराधम वडिलाचे नाव आहे. काही अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांनी सुमनला सांगितले की, त्यांने मुलीचा बळी दिला तर मुलगा होईल. या अंधश्रद्धेत त्याने आपल्या मुलीचा बळी दिला आहे. आरोपी सुमन नागेसिया हा अशिक्षित आहे. तो रोजीरोटीसाठी दुसर्‍या राज्यात गेला होता. त्याच वेळी, तेथे पुत्र प्राप्तीबाबत चर्चा झाली होती. त्याने सांगितले होते की, त्याला सहा वर्षांची मुलगी आहे आणि मुलगा नाही. मुलासाठी काय करावे लागेल. मुलाच्या अभावी सुमनने भगत वगैरेला बोलावले आणि घरीच पूजाअर्चा केली आणि अंगणात मुलीचा बळी दिला.

आपल्या मुलीचा बळी दिल्यानंतर 26 वर्षीय सुमन नागेसियाच्या पत्नीच्या काळजाचे तुकडे तुकडे झाल्याप्रमाणे रडत होती. नक्षलग्रस्त आणि कडाग्रस्त भाग असल्याने ग्रामस्थांनी सुमनला जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 55 किमी अंतरावर असलेल्या किस्को ब्लॉक मुख्यालयात आणले. त्यानंतर पेशारार पोलिसांनी तेथे धाव घेऊन सुमनला अटक केली. मुलीच्या शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. सुमनची पत्नी फुलमानिया नागेसिया भीतीने सिकरगड, पाखर येथे आपल्या गावी गेली आहे. अंधश्रद्धा पसरवणारा कुठल्या गावाहून आला हे समजू शकले नाही. अंगणात पूजा केल्यानंतर सुमनने आपल्या मुलीचा सुषमाचा बळी दिला, असे ग्रामस्थांनी सांगितले. पोलिसांनी सुमनला लोहरदगा मंडळाच्या तुरूंगात पाठविले आहे.