अपहरण झालेल्या उद्योजकाची काही तासांत सुखरूप सुटका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज पहाटेच्या सुमारास कोठला परिसरातून सिनेस्टाईल अपहरण झाले होते. पोलिसांनी त्यांची सुखरूप सुटका केली असून, दुपारी त्यांना नगरमध्ये आणले आहे.

याबाबत माहिती अशी की, आज पहाटेच्या सुमारास करीम हुंडेकरी हे नमाज पठन करण्यासाठी घराबाहेर पडले. ते मशिदीत पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या पाळतीवर असलेल्या टोळक्याने शस्त्राचा धाक दाखवून लाल रंगाच्या कारमध्ये घातले. त्यानंतर गाडीसह ते पसार झाले.

हुंडेकरी यांच्या अपहरणाच्या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने कोठला परिसरात धाव घेतली. अपहरणकर्त्यांच्या माहिती काढून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. अपहरण झाल्यानंतर काही तासात पोलिसांनी हुंडेकरी यांची सुखरूप सुटका केली. आरोपी पसार झाले असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like