पोलिसाचं अपहरण करणार्‍या दोघांच्या मुसक्या आवळल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात पोलिसाचे अपहरण करून मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्माचाऱ्याचे तीन तरुणांनी अपहरण केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारचा पाठलाग करून अपहरण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली. हा थरार आज सकाळी साडेदहाच्या सुमरास रमाबाई आंबेडकर नगर परिसरात घडला.

पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. विराज शिंदे (वय- २१), गौरव (वय- २९) यांना पोलिसांनी अटक केली तर राज (वय -२८) हा पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात अपहरण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छेडा नगर येथे तीन तरूणांनी कार रस्त्यात थांबवली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक पोलीस कारवाई करण्यासाठी कारजवळ गेले. पोलिसांना पाहताच तिघेजण पळून जाऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी गाडीत बसले. मात्र, तरुणांनी कार सुरु करून रमाबाई आंबेडकर नगरच्या दिशेने पळवली. दरम्यान या घटनेची माहिती रमाबाई आंबडेकर परिसरातील पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी रमाबाई आंबेडकर नगर परिसरात कार अडवून वाहतूक पोलीसाची सुटका केली.

पोलिसांनी दोघांना अटक केली तर एकजण फरार झाला. अटक करण्यात आलेला विराज शिंदे हा दारू पिऊन कार चालवत होता. त्याच्यासह दोघांवर अपहरणाचा आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दारू पिऊन गाडी चालविणे याअन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास टिळक नगर पोलीस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने