धक्कादायक ! अभिनेत्रीचं अपहरण करून तिच्यावर चक्क ‘कौमार्य’ चाचणी करण्यासाठी दबाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – येमेनची राजधानी असलेल्या सना इथून २० वर्षीय इंतिसार अल हम्मादी या अभिनेत्रींचे २० फेब्रुवारीला हौथी बंडखोरांनी अपहरण केले आहे. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्याबरोबरच तिच्यावर कौमार्य चाचणी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं इंतिसारच्या वकिलांनी म्हटलं आहे. याबाबतची माहिती मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या एमनेस्टी इण्टरनॅशनल या संस्थेने एका निवेदनातून प्रसिद्ध केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

एमनेस्टी इण्टरनॅशनल या संस्थेने दोन महिन्यांनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, इंतिसारला हौथी बंडखोरांनी ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी केली. तसेच तिचा छळ करत ड्रग्सचं सेवनं आणि वेश्या व्यवसाय करत असल्याची कबुली देण्यास तिला भाग पाडलं. त्याचबरोबर ती कुमारिका असल्याचं सिद्ध करण्यासाठी तिला कौमार्य चाचणी देण्यास दबाव टाकला जात असल्याचं वकिलांकडून सांगण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे.

हौथी बंडखोरांनी यमेनमधील बहुतांश भाग ताब्यात घेतला आहे. त्यानंतर सौदी अरेबियात पळ काढला. दरम्यान, राजधानी सनावर या बंडखोरांचे वर्चस्व असून मॉर्डन कपडे परिधान करणे, अनेकदा मुस्लिम समजातील हिजाब परिधान न केल्याने हौथी बंडखोरांकडून इंतिसार अल हम्मादीला लक्ष्य केल्याचेही या निवेदनावर म्हंटले आहे. दोन महिन्यांपूर्वी सना शहरात इंतिसारची गाडी थांबवून गाडीत गांजा असल्याचा आरोप करत हौथीच्या सैन्य दलाने तिला अटक केली.

हम्मादीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करत तिची चौकशी केली गेल्याचा दावा एमनेस्टी इण्टरनॅशनल या संस्थेने केला आहे तसेच वर्णभेद करत तिचा अपमान केलाच पण डोळ्यावर पट्टी असताना तिच्याकडू काही आरोपपत्रांवर जबरदस्तीने सही आणि अंगठ्याचा शिक्का घेतल्याची माहितीही सांगण्यात आली. सनामधील मध्यवर्ती कारागृहातील महिला विभागात दहा दिवसानंतर तिला हौथी बंडखोरांच्या सुरक्षा दलाने कैदैत ठेवले आहे. तिला कुटुंबियांना आणि वकिलाला भेटण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर इंतिसारच्या वकिलांनी तिची केस सोडून द्यावी यासाठी हौथी बंडखोरांकडून धमक्या दिल्या जात आहेत.