नगरमधील बड्या उद्योगपतीचे सिनेस्टाईल अपहरण, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरातील बड्या उद्योजकाचे आज पहाटेच्या सुमारास कोठला परिसरातून सिनेस्टाईल अपहरण झाले. चार ते पाच जणांच्या टोळक्याने शस्त्राच्या धाकाने त्यांना लाल रंगाच्या गाडीत घालून पळून नेले. या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून शोध सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की, आज पहाटेच्या सुमारास उद्दोगपती घराबाहेर पडले. ते नियोजित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या पाळतीवर असलेल्या टोळक्याने शस्त्राचा धाक दाखवून लाल रंगाच्या कारमध्ये घातले. त्यानंतर गाडीसह ते पसार झाले.

अपहरणाच्या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने कोठला परिसरात धाव घेतली. अपहरणकर्त्यांच्या माहिती काढून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अपहरण नेमके कोणी केले, याबाबत निश्चित माहिती हाती लागू शकली नाही. पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like