10 कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण ; अवघ्या चार तासांत मुलाची सुखरूप सुटका, चौघांना अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी गावठी कट्ट्याचा वापर करुन संगमनेर शहरातील व्यापारी कटारीया यांचे मुलाचे अपहरण करणारे आरोपींना अवघ्या ४ तासात स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पोलिसांनी अपहरण झालेल्या बारा वर्षाच्या मुलाचे सुटका करून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

विरेश शामराव गिरी (वय ३५, रा. साईश्रध्दा कॉलनी, संगमनेर), जनार्धन खंडू बोडके (वय १९, रा. काळाराम मंदिराजवळ, पंचवटी , जि. नाशिक), सचिन पोपट लेवे (वय १९, रा. सोमेश्वर बारदण फाटा,नाशिक), मयुर उर्फ पंकज प्रकाश उदावंत (वय २१, रा. साईश्रध्दा चौक) हे अटक केलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, प्रकाश फुलचंद कटारीया (वय ६५, रा. वृंदावन कॉलनी, मालपाणी प्लाझा, संगमनेर) येथून फिर्यादी यांचा नातू दक्ष महेश कटारीया (वय १२) यास कोणी तरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन आज पळून नेले होते.

गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी समांतर तपास सुरू केला. दुपारी साडेतीन वाजता १० कोटी रुपयांचे खंडणीसाठी मोबाईवर मेसेज केला. पुढे पैसे कोणत्या ठिकाणी घेऊन यायचे, हे १७पाच वाजता फोनव्दारे सांगतो, असे कळविले. पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांचे पथकातील अधिकारी कर्मचारी तसेच संगमनेर शहर पो.स्टे. चे पो. नि. श्री अभय परमार यांचे मदतीने समांतर तपास करत होते. त्यावेळी पवार यांना सदरचा गुन्हा हा संगमनेर शहरातील विरेश गिरी व त्याचे साथीदारांनी मिळून

केला असून तो सध्या पेरुचा बागे जवळ, मालदाड रोड, संगमनेर येथे आहे व तेथेच अपहरण केलेल्या मुलाला डांबुन ठेवले असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक दिलीप पवार, स.पो.नि. संदिप पाटील, पोलीस कर्मचारी रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, दिपक शिंदे, मेघराज कोल्हे, देविदास काळे, मल्लीकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, भागिनाथ पंचमुख, संदिप दरंदले, योगेश सातपुते, सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, अरविंद भिंगारदिवे, रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, बबन बेरड तसेच संगमनेर शहर पो.स्टे. चे पोनि. श्री अभय परमार, स. पो. नि. पाटील, पोसई कवडे, सफौ. गायकवाड, खंडीझोड, अमीत महाजन, तळेकर, आढाव, बोडखे आदींनी त्या ठिकाणी छापा टाकला. पोलीसांची चाहूल लागताच आरोपी अपहरण केलेल्या मुलास रस्त्यावर सुकेवाडी
परीसरात सोडून पळून गेले.

पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलाला सुखरूपपणे ताब्यात घेतले व आरोपींचा पाठलाग सुरु केला. पळालेले आरोपी हे संगमनेर शहरातून नाशिककडे मोटारसायकलवरुन पळून जात आहेत, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. पोलिसांनी सरकारी वाहनाने आरोपींचा पाठलाग करुन संगमनेर कारखाना गेट समोर, आरोपींना गाडी आडवी लावून थांबण्यास भाग पाडले.

त्याचवेळी आरोपी मोटार सायकल सोडून वेगेवेगळया दिशांना पळून जात असताना पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना मोठया शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी चौघांना अटक करून गावठी बनावटीचे स्टीलचे धातुचे पिस्टल, त्यात मॅगझीन असलेले व त्यात 2 राऊंड जप्त केले आहेत स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय वेगात तपास लावल्याबद्दल पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पस्तीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त