ऐकावे ते नवलच ! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन ‘मुलाचे’ अपहरण

तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दररोज येत असतात. अनेकदा या मुली घरातील लोकांचा प्रेमाला विरोध असल्याने त्या मुलाबरोबर पळून जात असतात. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. मात्र, एका अल्पवयीन मुलाला एका १९ वर्षाच्या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिघी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. १३ मार्च रोजी ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ४१ वर्षाच्या महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. चिखली येथे राहणाऱ्या एका १९ वर्षाच्या तरुणीने आपल्या १७ वर्षाच्या मुलाला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले, अशी फिर्याद दिली आहे.