Kidney Cure | किडनीच्या रुग्णांसाठी वरदानपेक्षा कमी नाहीत ‘हे’ 5 फूड्स, जाणून घ्या यादी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kidney Cure | किडनी (Kidney) हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो रक्त शुद्ध करतो. किडनीचे कार्य शरीरातून विषारी पदार्थ किंवा अतिरिक्त द्रव काढून टाकणे आहे. किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी (Kidney Health) त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. किडनीचा आजार जगाच्या लोकसंख्येपैकी 10% प्रभावित करतो (Kidney Cure).

 

असे अनेक लोक आहेत ज्यांना किडनीशी संबंधित समस्या आहेत, अशा लोकांनी ताबडतोब आपल्या आहारात बदल करणे आवश्यक आहे जेणेकरून किडनीचे नुकसान टाळता येईल (Kidney Cure).

 

आहार किडनीच्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाचा आहे. किडनीच्या समस्येची लक्षणे (Symptoms Of Kidney Problem) आहाराद्वारे कमी करता येतात आणि वेदनाही बर्‍याच प्रमाणात दूर करता येतात. तुम्हालाही किडनीचा त्रास होत असेल तर लगेच आहारात बदल करा. असे कोणते पदार्थ आहेत जे किडनी निरोगी ठेवतात ते जाणून घेवूयात (Let’s Know Which Foods Keep Kidney Healthy)…

 

1. लाल शिमला मिरचीचे सेवन करा (Eat Red Capsicum) :
लाल सिमला मिरची जेवढी खायला रुचकर आहे, तेवढीच ती आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. त्यात पोटॅशियमचे प्रमाण कमी असते, जे किडनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए तसेच व्हिटॅमिन बी 6, फॉलिक अ‍ॅसिड आणि फायबर (Vitamin C, Vitamin, Vitamin B6, Folic Acid And Fiber) मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे किडनी निरोगी राहते.

 

2. लसूण (Garlic) :
लसूण आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो जो आपण वारंवार वापरतो. तो मीठाला पर्याय देतो, जेवणाची चव वाढवतो. मँगनीज, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 6 समृद्ध असलेल्या लसूणमध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म (Anti-Inflammatory Properties) असतात. लसणाचे सेवन मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

3. कांदा (Onion) :
कांदा हा सोडियम मुक्त आहार आहे ज्यामुळे किडनीचे आरोग्य चांगले राहते. अन्नातील मीठाचे सेवन कमी करणे आव्हानात्मक असू शकते, परंतु मीठाला पर्याय शोधणे फार महत्वाचे आहे. लसूण आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये कांदा भाजल्याने किडनीचे आरोग्य सुधारते, तसेच जेवणाची चवही वाढते.

 

4. सफरचंद (Apple) :
सफरचंदाचे सेवन हा किडनीसाठी योग्य आहार आहे. यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि सोडियमचे प्रमाण कमी असते ज्यामुळे किडनी निरोगी राहते.
किडनीशी संबंधित समस्या असलेल्या लोकांसाठी सफरचंद खाणे अत्यंत फायदेशीर ठरेल.

 

5. कोबीचे सेवन करा (Eat Cabbage) :
फुलकोबीमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.
त्यात इंडोल, ग्लुकोसिनोलेट्स आणि थायोसायनेट्स देखील असते जे लिव्हरमधील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney Cure | a list of food items beneficial for kidney patients

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes | डायबिटीज रूग्णांसाठी रामबाण आहे ‘ही’ एक गोष्ट, रोज खाऊन करू शकता ब्लड शुगर कंट्रोल (Blood Sugar Control)

 

High BP | ‘हे’ 5 योग ठेवतात ब्लड प्रेशर कंट्रोल, हाय बीपीच्या रूग्णांरूग्णांसाठी महत्वाच्या अशा टिप्स; जाणून घ्या

 

औषधाशिवाय कंट्रोल होऊ शकते Blood Sugar, डॉक्टरांनी म्हटले – केवळ बदला ‘या’ 3 सवयी