home page top 1

‘किडनी स्टोन’ चा त्रास होतोय ? ‘हे’ पदार्थ टाळा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आजकाल किडनी स्टोनच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. किडनी स्टोनचे महत्वाचे कारण म्हणजे जड पाणी आणि क्षारयुक्‍त पाण्‍यापासून तयार झालेले पदार्थ. असे पदार्थ आहारात घेतल्‍यानंतर किडणी स्‍टोन होण्‍याचा धोका वाढतो. लघवीत कॅल्शियम, ऑक्झिलेट किंवा इतर क्षारकण एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर काही काळानंतर हळूहळू मुत्रमार्गात कठीण पदार्थ, खडे तयार व्हायला लागतात. हे कठीण पदार्थ म्हणजेच किडनी स्टोन.

काही पदार्थांमध्ये ऑक्झिलेटचं प्रमाण जास्त असतं. ते शरीरातल्या कॅल्शियमसोबत मिसळून त्याचे खडे तयार होतात. या आजारामध्ये रुग्णाला प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून काही पत्थ्ये पाळावी लागतात. जाणून घ्या असे कोणते पदार्थ किडनी स्टोनच्या रुग्णांनी आहारातून वर्ज्य करावेत किंवा कमी प्रमाणात घ्यावे.

1) कोबी, काजू, चॉकलेट, भेंडी, पालक, चुका, दूध या पदार्थांमध्ये ऑक्झिलेट या घटकाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी हे पदार्थ खाणे टाळावे.

2) किडनी स्टोनच्या रुग्णांनी मांसाहार करू नये. मटन व काही प्रकारच्या माशांमध्ये ऑक्झिलेट प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे मांसाहार करू नये.

3) मीठामध्ये असणारं सोडियम शरीरात गेल्यावर कॅल्शियममध्ये रुपांतरीत होतं आणि त्याचे खडे होण्यास सुरुवात होते. त्यामुळे जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे.

4) व्हिटॅमिन-सी जास्त असलेले पदार्थ टाळावेत. उदा. आवळा

Image result for आवळा

5) जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्सचे सेवन करू नये.

Image result for कोल्ड ड्रिंक्स

6) चहा प्यायल्याने खड्याचा आकार अधिक वाढायला लागतो त्यामुळे चहा कमी प्रमाणात प्या किंवा टाळाच.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like