Kidney Failure | कमजोरी, थकवा आणि खाज यासारखी 9 लक्षणे असू शकतात किडनी फेल होण्याचे संकेत, पाहून घ्या पूर्ण लिस्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kidney Failure | किडनी (Kidney) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या शरीराला निरोगी ठेवतो. संपूर्ण शरीराचा समतोल राखणे हे किडनीचे कार्य आहे. किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी काढून टाकते. ती लाल रक्तपेशी (Red Blood Cells) तयार करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित (Controlling Blood Pressure) करण्यास मदत करते. किडनीची योग्य काळजी घेतली नाही तर किडनी निकामी होण्याची भीतीही असते. किडनी निकामी (Kidney Failure) होण्यासाठी चुकीचा आहार जबाबदार आहे (Causes Of Kidney Failure).

 

– किडनी फेल्युअर म्हणजे काय (What Is Kidney Failure) ?
किडनी फेल्युअर म्हणजे तुमच्या किडनीची 85-90% काम करण्याची क्षमता नष्ट झाली आहे. किडनी जगण्यासाठी आवश्यक तेवढे काम करू शकत नाही. किडनी निकामी होण्यावर कोणताही इलाज नाही, परंतु त्यावर दीर्घकाळ उपचार करता येतात.

 

ज्या लोकांची किडनी खराब झाली आहे त्यांचा मृत्यू निश्चित आहे असे नाही. किडनी निकामी झाल्यानंतरही लोक त्यावर उपचार करून दीर्घकाळ जगतात.

 

– किडनी निकामी होण्याचे कारण काय (What Causes Kidney Failure) ?
उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि मधुमेह (Diabetes) ही किडनी निकामी होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. शारीरिक दुखापत, रोग किंवा इतर विकारांमुळे देखील किडनी खराब होऊ शकते.

 

– Kidney निकामी झाल्यास काय होते (What Happens When Have Kidney Failure) ?
किडनी निकामी होणे हे एका रात्रीत होत नाही तर दीर्घकाळ चालणार्‍या किडनीच्या समस्यांमुळे होते. काही लोकांना किडनी निकामी होईपर्यंत किडनीच्या आजाराचे (Kidney Disease) निदान होत नाही. सहसा, किडनीच्या आजाराची लक्षणे लवकर दिसत नाहीत, जेव्हा समस्या अधिक तीव्र होते, तेव्हा फक्त किडनी निकामी होण्याची लक्षणे दिसतात. किडनी निकामी होण्याची लक्षणे काय आहेत ते जाणून घेवूया.

– किडनी खराब होण्याची लक्षणे (Symptoms Of Kidney Failure)

1. निद्रानाश

2. अपुरी भूक

3. अशक्तपणा

4. थकवा

5. खाज सुटणे

6. वजन कमी होणे

7. स्नायूंमध्ये पेटके (विशेषत: पायांमध्ये)

8. पाय किंवा घोट्याला सूज येणे

9. अ‍ॅनिमिया (रक्ताचे कमी प्रमाण)

 

किडनी निकामी होण्यावर कोणते उपचार (What Is Treatment For Kidney Failure) ?
किडनी निकामी होण्यासाठी दोन उपचार आहेत, एक डायलिसिस आणि दुसरा किडनी प्रत्यारोपण. डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण खराब झालेल्या किडनीचे काही काम करते आणि शरीरातील कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकते. हे दोन्ही उपचार केल्याने किडनी निकामी होण्याची लक्षणे सुधारतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- what is kidney failure know the causessymptoms and treatment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांची नवी शक्कल ! मोबाईल पाठवून त्यातील अ‍ॅपमध्ये माहिती भरायला सांगून साडेसात लाखांची फसवणूक

 

President Election 2022 | शरद पवार ‘राष्ट्रपती’ पदासाठीचे उमेदवार, विरोधी पक्षाची सहमती?

 

Eknath Khadse | ‘गाफील राहिल्याने राज्यसभेत पराभव, विधानपरिषदेला ताकही फुंकून पिण्याची गरज’ – एकनाथ खडसे