Kidney Health | ‘या’ 5 वस्तूंपासून रहा दूर, अन्यथा किडनीचे होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कसे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kidney Health | किडनी हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. अशा काही रोजच्या सवयी असतात ज्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम तर होतोच, शिवाय किडनीचे आरोग्यही बिघडते. किडनी शरीरातील पोटॅशियम, मीठ यांचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते. यासोबतच, लाल रक्तपेशी निर्माण करणे हे तिचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. पण काही वेळा काही गोष्टी किडनीचे नुकसान करू लागतात. (Kidney Health)

 

शरीर निरोगी ठेवण्यासाठी किडनीने योग्य कार्य करणे आवश्यक आहे. ती शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यासोबतच किडनी रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास, शरीरातील द्रवपदार्थाचे प्रमाण संतुलित करण्यास आणि युरीन करण्यास मदत करते. अशा स्थितीत हृदय आणि मेंदीच्या आरोग्या इतकीच किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. (Kidney Health)

 

काही रोजच्या सवयींमुळे किडनीवर खूप वाईट परिणाम होतो. अशा गोष्टींपासून जितके जास्त अंतर ठेवाल तितके किडनीसाठी चांगले. कोणत्या सवयींमुळे किडनी खराब होऊ शकते ते जाणून घेवूयात…

 

1. लघवी रोखणे (Urinary Retention) :
लघवी जास्त वेळ रोखून ठेवण्याच्या सवयीमुळे किडनी स्टोनची (Kidney stone) समस्या वाढू शकते. लघवी जास्त वेळ दाबून ठेवल्याने लघवीला संसर्ग, ब्लॅडरमध्ये संसर्ग किंवा गंभीर प्रकरणांत किडनीमध्ये संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

 

2. नॉन-व्हेजपासून दूर रहा (Avoid Non-Veg) :
या पदार्थांमध्ये भरपूर प्रोटीन आढळतात. जास्त प्रोटीन खाल्ल्याने सामान्यपेक्षा जास्त कॅल्शियम मूत्रातून उत्सर्जित होते. प्रोटीनच्या नियमित वापरामुळे मेटाबॉलिज्म प्रभावित होते. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.

3. मीठ (Salt) :
सोडियम हे पोटॅशियमसोबत मिळून शरीरात द्रवपदार्थ संतुलित करते. परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ खाल्ले तर द्रवपदार्थाचे प्रमाण देखील वाढेल, ज्याचा दबाव किडनीला सहन करावा लागतो. किडनीचे काम शरीरातील अतिरिक्त क्षार काढून टाकणे आहे.

 

4. कॉफी (Coffee) :
यातील कॅफिन किडनीसाठी हानिकारक आहे. कॅफीनमुळे किडनीचा त्रास तर वाढतोच, पण स्टोनही होऊ शकतो.
विशेषत: किडनीत एखादी समस्या अगोदरच असेल तर कॉफी पासून दूर रहा.

 

5. कमी पाणी पिण्याची सवय (Drinking less water) :
किडनी निरोगी ठेवण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात प्यावे. निरोगी व्यक्तीने दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे.
पाणी प्यायल्याने किडनी स्टोन होत नाही, यासोबतच त्वचाही सुंदर राहते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney Health | kidney health avoid these 5 things otherwise kidney can be damaged you should know

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Winter Diet Chart | हिवाळ्यात कसा असावा डाएट चार्ट, जाणून घ्या सविस्तर

Diabetes & Egg | डायबिटीजच्या रुग्णांनी अंडे खावे का? जाणून घ्या तत्ज्ञांचा सल्ला

Diabetes – High Blood Sugar Level | डायबिटीजच्या रूग्णांमध्ये पपई खाल्ल्याने वाढू शकते का ब्लड शुगर? जाणून घ्या काय आहे सत्य