Kidney Health | किडनीसाठी लाभदायक आहेत हे ३ लेमन ड्रिंक्स, किडनी होईल क्लीन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kidney Health | रक्त स्वच्छ करण्याचे आणि शरीरातून टॉक्सीन काढण्याचे काम किडनी करते. पण अनेक वेळा हे टॉक्सीन किडनीला इजा करते आणि किडनी निकामी होते. पण रोज एक ड्रिंक पिऊन तुम्ही तुमचा हा खास अवयव स्वच्छ करू शकता आणि किडनीला (Kidney Health) होणारे नुकसान टाळू शकता. किडनी स्वच्छ करण्याचे ड्रिंक कधी आणि कसे प्यावे ते जाणून घेऊया (Lemon Drinks for Kidney).

 

शरीरात किडनीचे महत्त्व काय? (Importance of Kidney in Body)
किडनीचे मुख्य कार्य म्हणजे शरीरातील घाण आणि द्रवपदार्थ शरीरातून लघवीद्वारे बाहेर काढणे. याशिवाय किडनी मानवी शरीरातील मीठ, पोटॅशियम आणि अ‍ॅसिडचे प्रमाण नियंत्रित करते. त्याच वेळी, ते हार्मोन्सदेखील मूत्रपिंडातून सोडते जे आपल्या शरीराच्या इतर भागांना कार्य करण्यासाठी आवश्यक असतात.

 

किडनीसाठी फायदेशीर आहे लिंबू (Lemon Benefits for kidney)
हार्वर्डच्या एका रिपोर्टनुसार, दररोज २ लिंबाचा रस प्यायल्याने युरिन सायट्रेट (Urinary Citrate) वाढते आणि किडनीतून विषारी पदार्थ (Toxins) बाहेर काढले जातात. त्याच वेळी, जे लोक दररोज २ ते २.५ लिटर लघवी करतात, त्यांना किडनी स्टोन होण्याचा धोका कमी असतो. किडनीला हेल्दी बनवणारे हे ड्रिंक तुम्ही सकाळी आणि दुपारी पिऊ शकता. (Kidney Health)

किडनी स्वच्छ करणारे लेमन ड्रिंक्स (Lemon Drinks for Kidney)

१. पुदिना लिंबूपाणी (Lemon with Mint)
एका ग्लास पाण्यात लिंबाचा रस, पुदिन्याची पाने आणि थोडी साखर घालून चांगले मिसळा आणि नंतर किडनीसाठी हे हेल्दी ड्रिंक प्या.

 

२. मसाला लिंबू सोडा (Masala Lemon Soda)
एका ग्लासमध्ये लिंबाचा रस, जिरे-धणे पूड, चाट मसाला आणि सोडा एकत्र करा. अशा प्रकारे किडनीसाठी हेल्दी ड्रिंक तयार होईल.

 

३. कोकनट शिकंजी (Coconut Shikanji)
हेल्दी किडनी ड्रिंक बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये नारळपाणी घ्या. या पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या.

 

Web Title :-  Kidney Health | lemon drink kidney failure benefits mint masala soda lemonade coconut shikanji toxins salt

   

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Milk Tea Side Effects | पिऊ नये दुधाचा चहा, शरीरात निर्माण होऊ शकतात या ७ गंभीर समस्या

Pune Pimpri Crime | पेट्रोलपंपचालकाची तब्बल 21 लाखांची फसवणूक, पिंपरी चिंचवड परिसरातील घटना

Health Tips | निरोगी शरीरासाठी रोज करा या फूडचे सेवन, वेट लॉस आणि इम्युनिटी वाढण्यासह होतील हे ७ मोठे फायदे