Kidney Health | ‘किडनी डॅमेज’ करू शकतात तुमच्या ‘या’ 7 वाईट सवयी, लवकरच सुधारणा करा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kidney Health | किडनी शरीरातून टॉक्सिन आणि टाकऊ पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. ती शरीरातील अ‍ॅसिड बाहेर काढून पाणी, मीठ आणि मिनरल्सचे संतुलन ठेवते. नर्व्ह, मसल आणि टिशूच्या हेल्दी बॅलन्सशिवाय मनुष्याचे शरीर योग्यप्रकारे काम करू शकत नाही. आपल्या रोजच्या काही चुकीच्या सवयींमुळे किडनीवर खुप वाईट परिणाम होतो. अशा सवयींकडे लक्ष दिले नाही तर किडनी फेलियर किंवा डॅमेजचा (Kidney Health) धोका होऊ शकतो.

या 7 सवयी ताबडतोब सोडा

1. पेनकिलर्सचा अतिवापर –
नॉनस्टेरॉईड अँटी इनफ्लेमेटरी ड्रग (NSAIDs) वेदनेपासून आराम देण्याचे काम करतात. परंतु याचा अतिवापर वेगाने किडनी डॅमेज (Kidney Health) करू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर्स घेऊ नका.

2. मीठ –
हाय सोडियम (मीठ) युक्त आहार ब्लड प्रेशर वाढवण्याचे काम करतो. यामुळे किडनीच्या आजारांचा धोका वाढतो. योग्यप्रमाणात मीठ खा.

3. प्रोसेस्ड फूड –
प्रोसेस्ड फूडमध्ये सोडियम आणि फॉस्फरस भरपूर असते. यामुळे किडनी खराब होते. हाडांचे सुद्धा नुकसान होते. प्रोसेस्ड फूड सेवन करू नका.

4. शरीर हायड्रेट न ठेवणे –
शरीर हायड्रेट राहिल्याने टॉक्सिन आणि अतिरिक्त सोडियम बाहेर पडते. यासाठी दिवसभरात योग्यप्रमाणात पाणी प्या. यामुळे किडनी स्टोनची जोखीम कमी होते.

5. साखर –
साखरेचे अतिरिक्त सेवन लठ्ठपणाचा आजार वाढवते. यामुळे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. हे दोन आजार किडनी सुद्धा डॅमेज करू शकतात. गोड खाणे कमी करा.

6. एकाच ठिकाणी बसून राहणे –
दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहणे किंवा शरीर निष्क्रिय ठेवणे सुद्धा किडनी डिसीजचे कारण ठरू शकते. खराब जीवनशैलीचा किडनीवर वाईट परिणाम होतो.

7. मांस –
अ‍ॅनिमल प्रोटीन रक्तात अ‍ॅसिडच उच्च प्रमाण तयार करते. हे आपली किडनी डॅमेज करू शकते आणि अ‍ॅसिडोसिसचे कारण ठरू शकते. अ‍ॅसिडोसिस एक असा रोग आहे ज्यामध्ये मनुष्याची किडनी वेगाने अ‍ॅसिड बाहेर काढू शकत नाही.

Web Title :- Kidney Health | these 7 mistakes can damage your kidney

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | घरफोडी करणारे 2 सराईत पुणे पोलिसांकडून गजाआड, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Diabetes | डायबिटीज रुग्णांनी आवश्य खावी ‘ही’ वनस्पती, ब्लड शुगर होईल नियंत्रित; जाणून घ्या

Sharad Pawar | ‘आमची पोरं काय करतील याचा नेम नाही’ शरद पवारांनी सांगितला जयंत पाटलांच्या मुलाचा ‘किस्सा’