Vitamin Deficiency | ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होते करळी Hair Fall, शरीरात सुद्धा येते कमजोरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vitamin Deficiency | व्हिटॅमिन्स आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषकतत्व असतात, त्याशिवाय आपण चांगल्या आरोग्याची अपेक्षा करू शकत नाही. निरोगी केसांसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. या पोषक तत्वाचा सर्वात मोठा स्त्रोत सूर्यप्रकाश आहे, म्हणूनच याला सनशाईन व्हिटॅमिन म्हणतात. आपण अनेक अन्नपदार्थ खाऊन देखील हे पोषकतत्व मिळवू शकतो. जर व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर आपल्या शरीराला कोणते नुकसान सहन करावे लागते. (Vitamin Deficiency)

 

1. शरीर कमकुवत होते
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे आपले शरीर कमकुवत होऊ लागते, त्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. हे टाळण्यासाठी तुम्ही रोज 15 ते 20 मिनिटे उन्हात राहावे किंवा अंडी, दही, संत्री आणि गाईचे दूध प्यावे. (Vitamin Deficiency)

 

2. केस गळणे
केस गळणे ही सध्याच्या काळातील एक सामान्य समस्या बनली आहे, ज्यामुळे अनेकांना लहान वयातच टक्कल पडण्याचा त्रास सहन करावा लागतो. व्हिटॅमिन डी हेअर फॉलिकल्स वाढवते. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास केस झपाट्याने गळण्यास सुरूवात होते.

 

3. हाडांमध्ये वेदना
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास, कॅल्शियम शोषण्यात समस्या निर्माण होते, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात आणि वेदना होऊ शकतात. हाडांच्या आरोग्यासाठी कितीही कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ले तरी व्हिटॅमिन डी मिळाल्याशिवाय फायदा होत नाही.

4. मेंटल हेल्थवर परिणाम
खूप कमी लोकांना माहिती आहे की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा आपल्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो, ज्यामुळे आपल्याला मूड बदलणे, तणाव, चिंताग्रस्त होणे यासारख्या परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो.

 

5. बरे होण्यास वेळ लागतो
जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते, तेव्हा दुखापत झाल्यानंतर ती लवकर बरी होत नाही,
याशिवाय जखम भरून येण्यासही बराच वेळ लागतो. कारण व्हिटॅमिन डी जखमा भरण्यास मदत करते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney Health | these habits can cause kidney failure make these lifestyle changes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Diet | थंडीत वाढू शकते ब्लड शुगर, कंट्रोल करण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचा डाएटमध्ये करा समावेश

Fasting Liquid | सणानंतर ‘या’ 5 देशी ड्रिंक्सने शरीर होईल डिटॉक्सिफाई

Cholesterol Control | थंडीत वाढले कोलेस्ट्रॉल तर ‘या’ 5 हेल्दी फॅट फूड्सने करा कंट्रोल