Kidney Problem | तुम्हाला माहित आहे का? किडनी खराब झाल्यानंतर कुठे होतात वेदना? जाणून घ्या कशी घ्यावी मूत्रपिंडाची काळजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kidney Problem | किडनी (Kidney) हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. किडनी शरीरातील पोटॅशियम (Potassium) आणि मीठाचे (Salt) प्रमाण संतुलित करण्यास मदत करते. यासोबतच, लाल रक्तपेशी (Red Blood Cells) निर्माण करणे हे तिचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीची एक किडनी (Kidney Problem) काही कारणाने निकामी झाली असेल, तर ती व्यक्ती दुसर्‍या किडनीच्या मदतीने सामान्य जीवन जगू शकते. त्यास आरोग्याची जास्त काळजी घेण्याची आवश्यक असते.

 

शरीर निरोगी ठेवण्यासाठी किडनी शरीरातील विषारी पदार्थ (Toxic Substances) काढून टाकते. यासोबतच किडनी रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकते, शरीरातील द्रवाचे प्रमाण संतुलित करण्यास आणि लघवी तयार करण्यास मदत करते. अशा स्थितीत हृदय (Heart Health) किंवा मनाच्या आरोग्या (Mental Health) इतकेच किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

 

भारतात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार, किडनी विकणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. कायद्यानुसार रक्ताच्या नात्यातच किडनी दान करता येते. किडनी निकामी झाल्यामुळे पाठीच्या खालच्या भागात दुखणे, अंगदुखी, खाज सुटणे आणि पायात पेटके येणे या किडनीच्या आजाराच्या (Kidney Problem) सामान्य तक्रारी आहेत. किडनीचे मुख्य कार्य रक्त शुद्ध करणे आहे. ती निरोगी असणे खूप महत्वाचे आहे.

किडनी निकामी होण्याची सुरुवातीची लक्षणे कोणती (What Are The Early Symptoms Of Kidney Failure)?

भूक न लागणे. (Loss Of Appetite)

वजन कमी होते. (Weight Loss)

घोटे आणि पायांना सूज येणे. (Swelling of Ankles And Feet)

त्वचेमध्ये कोरडेपणा आणि खाज येते. (Dryness And Itching Of The Skin)

अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. (Feeling Weak And Tired)

वारंवार लघवी होण्याची समस्या होते. (Frequent Urination Problem)

 

किडनी मजबूत करण्यासाठी काय खावे (What To Eat To Strengthen The Kidneys)?

1. लाल सिमला मिरची खावी. (Eat Red Shimla Chilli)

2. फ्लॉवरचे सेवन फायदेशीर आहे. (Consumption Of Flower Is Beneficial)

3. आहारात कांद्याचा समावेश करावा. (Onion Should Be Included In Diet)

4. भरपूर स्ट्रॉबेरी खावी. (Eat Strawberries)

5. अंड्याचा पांढरा भाग खावा. (Eat Egg Whites)

 

किडनीची चाचणी कशी करावी (How To Test A Kidney)?
किडनीच्या अनेक आजारांचे निदान करण्यासाठी किडनी बायोप्सी (Kidney Biopsy) ही एक आवश्यक चाचणी आहे. किडनीच्या स्थितीचे निदान करण्यासाठी अल्ट्रासाऊंड (Ultrasound) किंवा सीटी स्कॅन (CT Scan) केले जाते. ज्यामुळे किडनी बायोप्सीसाठी अचूक ठिकाण ठरवता येते, जिथून सुई आत टाकली जाऊ शकते.

किडनीचा रुग्ण दूध पिऊ शकतो का (Can A Kidney Patient Drink Milk)?
प्रोटीन प्रामुख्याने दूध (Milk), कडधान्ये (Cereals), धान्ये (Grains), अंडी (Eggs), चिकन (Chicken) यांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. जेव्हा डायलिसिसची (Dialysis) गरज नसते, तेव्हा त्या टप्प्यावर किडनी निकामी झालेल्या रुग्णांना थोडेसे कमी प्रोटीन (शरीराच्या वजनाच्या 0.8 ग्रॅम/किलो समतुल्य) वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी दुग्धजन्य पदार्थ टाळावेत.

 

लिव्हर आणि किडनीमध्ये काय फरक आहे (What Is The Difference Between Liver And Kidney)?
किडनी एक मूत्र प्रणाली अवयव आहे तर लिव्हर एक पाचक प्रणाली आहे. माणसाच्या शरीरात दोन मूत्रपिंड आणि एक लिव्हर असते. किडनी काहीही साठवत नाहीत तर लिव्हर ग्लुकोज (Glucose) आणि चरबी (Fat) साठवते. किडनी हा हजारो लहान युनिट्सने बनलेला जटिल अवयव आहे, ज्यास नेफ्रेन (Nephron) म्हटले जाते.

 

किडनी खराब झाल्यास काय करावे (What To Do In Case Of Kidney Failure)?

नियमित व्यायाम करा. (Exercise Regularly)

दोन ते तीन लिटर द्रव घ्या. (Take Two To Three Liters Of Liquid)

सकस आहार घ्या. (Eat Healthy Diet)

डॉक्टरांचा सल्ल्याने वेदनाशामक घ्या. (Take Painkillers On Doctor’s Advice)

धुम्रपान करू नका. (Don’t Smoke)

रक्तदाब, ब्लड शुगर नियंत्रणात ठेवा. (Control Blood Pressure, Blood Sugar)

दीर्घकालीन समस्यांवर किडनी प्रत्यारोपण किंवा डायलिसिसद्वारे उपचार केले जातात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney Problem | know where the pain occurs due to kidney failure know how to take care of kidney

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Steam | सर्दीसाठीच नाहीतर ब्लड सर्कुलेशनसाठीही वाफ घेणे ठरते फायदेशीर; जाणून घ्या

 

Black Salt Health Benefits | चिमुटभर काळे मीठ नष्ट करू शकते शरीरातील धोकादायक बॅक्टेरिया, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

 

Nonalcoholic Fatty Liver Disease | मासिक पाळी वेळेवर येत नाही का? या गंभीर आजाराचा आहे धोका; जाणून घ्या सविस्तर